शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

"एकनाथ खडसे हे सरपटणारे, रंग बदलणारे...", चंद्रकांत पाटलांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 13:53 IST

अजून एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच काम करण्याचे संकेत दिले आहेत.

गेल्या काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. तसेच, लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार केला होता. तरीही, अद्याप एकनाथ खडसे हे भाजपमध्ये सामील झाले नाहीत. त्यामुळे एकनाथ खडसे कोणत्या पक्षात आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला. यावर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपमध्ये माझा प्रवेश झाला, पण घोषणा झालेली नाही. काही दिवस वाट पाहीन आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा सक्रिय होईन, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. 

मुक्ताईनगरमधील शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 'हे रंग बदलणारे सरपटणारे प्राणी आहेत' अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर टीका केली. तसेच, एकनाथ खडसेंच कुटुंबच संभ्रमात टाकणारं आहे, आज राष्ट्रवादी आणि उद्या भाजपमध्ये. आधी सुनेला लोकसभेत पोहोचवलं, त्यानंतर आता मुलीसाठी सोयीस्करपणे राजकारण करणारे खडसे आहेत. एकनाथ खडसे हे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारे आहेत. गेल्या ३० वर्षात एकनाथ खडसेंनी कुठलाही विकास मतदारसंघात केला नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

दरम्यान, काल (दि.२) एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये बॅनर झळकले होते. या बॅनरवर शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो दिसून आले. त्यामुळे एकनाथ खडसे नेमकं कोणत्या पक्षात आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. पण अजून एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच काम करण्याचे संकेत दिले आहेत. भाजपमध्ये माझा प्रवेश झाला, पण घोषणा झालेली नाही. काही दिवस वाट पाहीन आणि राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होईन, असे  एकनाथ खडसे यांनी म्हटले. 

काय म्हणाले होते एकनाथ खडसे?"भाजपमध्ये माझा प्रवेश करण्यात यावा, अशी विनंती मी भाजपकडे केली होती. मात्र, भाजपकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मी भाजपकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार आहे. जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये माझा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला. पण, त्याला खाली विरोध झाल्याने तो जाहीर होऊ शकला नाही. त्यामुळे आता भाजपमध्ये राहणे उचित होणार नाही," असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगावMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण