मालेगाव हवाला आणि मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, 13.7 कोटी केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 08:29 IST2024-12-07T08:28:15+5:302024-12-07T08:29:06+5:30

ईडीने भेसनिया वली मोहम्मद याला अटक केली आहे. बँकांतून पैसे काढून हवाला मार्फत पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

ED's big action in Malegaon hawala and money laundering case, 13.7 crores seized | मालेगाव हवाला आणि मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, 13.7 कोटी केले जप्त

मालेगाव हवाला आणि मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, 13.7 कोटी केले जप्त

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मालेगाव हवाला आणि अवैध बँक व्यवहाराशी संबधित मनी लॉड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई केली. ईडीच्या पथकांनी मुंबई आणि अहमदाबाद येथील २ ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत ईडीने तब्बल १३.७ कोटी रुपये रोकड जप्त केली. 

ईडीच्या तपासातून समोर आले आहे की, मजुरांची ओळखपत्रे वापरून बँकांमध्ये खाती उघडण्यात आली होती. त्यानंतर या खात्यांचा वापर करून तब्बल १९६ कोटी रुपयांचे व्यवहार केले गेले. या प्रकरणात मुख्य आरोपी मालेगावमधील सिराज मेमन असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

या आठवड्याच्या सुरूवातीला ईडीने याच प्रकरणात भेसनिया वली मोहम्मद याला अटक केली होती. त्याने हवाला मार्फत पैसे पाठवण्यासाठी बँकांतून कोट्यवधी रुपये काढले. वली मोहम्मद कर्मचारी असून, त्याचा पगार ३३ हजार आहे. कंपनी मालकाच्या सांगण्यावरून त्याने हे व्यवहार केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. 

ईडीच्या माहितीनुसार, वली मोहम्मद कंपनीचा एमडी असून, त्याला मोहम्मद समद उर्फ चॅलेंजर किंग म्हणूनही ओळखले जाते. वली मोहम्मद सूरतचा राहणारा आहे. 

ज्या कर्मचाऱ्यांचा बँक खाते उघडण्यासाठी केवायसीसाठी वापर करण्यात आला होता, त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. पोलिसांनी चहाचे दुकान चालवणाऱ्या मालेगावमधील सिराज मेमन याला अटक केली. सिराज मेमननेच लोकांच्या नावाने खाती उघडली. 

हवाला चालवणारे इतरही लोक यात सामील असण्याचा ईडीला संशय असून, आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची ईडीने चौकशी सुरू केली आहे. 

Web Title: ED's big action in Malegaon hawala and money laundering case, 13.7 crores seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.