शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसेंना ईडीचा दणका; ५ कोटी ७३ लाखांच्या मालमत्तेवर टाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 12:00 IST

लोणावळा आणि जळगाव येथील खडसेंची मालमत्ता ईडीकडून जप्त

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचलनालयानं (ED) दणका दिला आहे. ईडीनं एकनाथ खडसे यांची ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. लोणावळा आणि जळगाव इथल्या खडसेंच्या मालमत्तांवर ईडीनं टाच आणली आहे. ईडीनं केलेली कारवाई खडसेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. खडसेंनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

भोसरी एमआयडीसी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणात माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सक्तुवसुली संचलनालयानं नोटीस पाठवली होती. गेल्या महिन्यात खडसेंची ९ तास चौकशी करण्यात आली होती. पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड व्यवहार प्रकरणात खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अचक झाल्यानंतर खडसेंची चौकशी करण्यात आली होती. खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीनं समन्स बजावलं होतं. मंदाकिनी खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून १४ दिवसांची मुदत मागितली होती.

भोसरी जमीन घोटाळा नेमका आहे तरी काय?फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची केवळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय