शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Raj Thackeray: निवडणुकीच्या काळात पुलवामासारखा अजून एक हल्ला घडवला जाईल, राज ठाकरेंना शंका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 8:11 PM

तसेच सर्व पातळीवर अपयशी ठरलेले हे सरकार लोकसभा निवडणुकीच्या काळात येत्या एक, दीड महिन्यामध्ये पुलवामासारखा अजून एक हल्ला घडवून आणेल

मुंबई -  मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारवर पुलवामा येथील हल्ला आणि त्यानंतर झालेल्या एअरस्ट्राइकवरून सुरू असलेल्या राजकारणावरून जोरदार टीका केली. तसेच सर्व पातळीवर अपयशी ठरलेले हे सरकार लोकसभा निवडणुकीच्या काळात येत्या एक, दीड महिन्यामध्ये पुलवामासारखा अजून एक हल्ला घडवून आणेल, अशी शंका राज ठाकरे यांनी उपस्थित केली. 

राज ठाकरे म्हणाले की, ''. ''पुढच्या महिन्या दीड महिन्यात असाच एक पुलवामासारखा हल्ला घडवला जाईल, मग पुन्हा राष्ट्रभक्तीची भाषणं केली जातील. मग पुन्हा देशभक्तीचे वारे वाहतील. कारण या सरकारने दिलेली सर्व आश्वासने  खोटी ठरली आहेत.''

 

दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुलवामा येथील आत्मघाती हल्ला बालाकोट येथे झालेल्या एअर स्ट्राइकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने एकर स्ट्राइक केला. पण त्यांना चुकीची माहिती दिली गेली. त्यामुळे बाँम्ब जंगलात पडले. त्यामुळे दहशतवादी मेलेच नाहीत, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.  

पुलवामा येथील दहशतवादी हल्ला, त्यानंतर झालेली एअर स्ट्राइक, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने दाखवलेल्या देशभक्तीवर राज ठाकरे यांनी चौफेर टीका केली. पुलवामा हल्ल्यावेळी सीआरपीएफने केलेली विमान प्रवासाची विनंती फेटाळली गेली, याबाबत राज ठाकरेंनी शंका उपस्थित केली. तसेच अजित डोभालांच्या मुलाच्या कंपनीत पाकिस्तानी व्यक्तीच्या असलेल्या भागीदारीविषयी राज यांनी सवाल उपस्थित केला. 

यावेळी राज ठाकरे यांनी एअर स्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांच्या झालेल्या मृत्यूबाबतही शंका उपस्थित केली. ते म्हणाले की, ''कुठलेही लष्कर हे माहितीच्या आधारावर कारवाई करते. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने एकर स्ट्राइक केला. पण त्यांना चुकीची माहिती दिली गेली. त्यामुळे बाँम्ब जंगलात पडले. त्यामुळे दहशतवादी मेलेच नाहीत.'' 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९