शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

प्रचारकाळातच लागली होती विजयाची चाहूल : संगीता गोरंट्याल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 12:55 PM

जालना शहरातील विकासामुळेच जनतेने काँग्रेसला प्रचंड मताधिक्य दिल्याचे सौ. गोरंट्याल यांनी सांगितले. तसेच कैलास गोरंट्याल यांचा विकास कामाचा धडाका आणि विविध योजनांचा केलेला पाठपुरावा जनतेने लक्षात ठेवल्याचे त्या म्हणाल्या.

मुंबई - 2014 मध्ये अत्यंत चुरशीची ठरलेली आणि राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चीली गेलेली जालना विधानसभा मतदार संघातील लढत काही प्रमाणात एकतर्फी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेसनेते कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर लढतीत चुरशीची होणार अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु गोरंट्याल यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत पुन्हा एकदा विधानसभेत प्रवेश केला. या विजयाची चाहूल आपल्याला निवडणूक प्रचारातच लागली होती, असं आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी तथा जालना नगरपालिकेच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी सांगितले. त्यांनी लोकमतशी संवाद साधला.

जालना विधानसभा निवडणुकीतील विजय नेहमीच ग्रामीण मतदारांवर निर्भर राहिलेला आहे. अर्जुन खोतकर यांना ग्रामीण मतदारांची मोठी साथ मिळते. तर शहरी मतदारांची पसंती गोरंट्याल यांना असते. यावेळीही ग्रामीण मतदारांमुळे गोरंट्याल यांना अडचण होणार अशी चर्चा मतदारसंघात होती. परंतु, आधीच्या सर्व निवडणुकीपैकी या निवडणुकीत ग्रामीण मतदारांनी गोरंट्याल यांच्या पारड्यात मत टाकले. त्यामुळे गोरंट्याल यांचा 25 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला.

जालना शहरातील विकासामुळेच जनतेने काँग्रेसला प्रचंड मताधिक्य दिल्याचे सौ. गोरंट्याल यांनी सांगितले. तसेच कैलास गोरंट्याल यांचा विकास कामाचा धडाका आणि विविध योजनांचा केलेला पाठपुरावा जनतेने लक्षात ठेवल्याचे त्या म्हणाल्या. किंबहुना प्रचाराच्या काळात जनतेतून मिळत असलेला पाठिंबा पाहुनच विधानसभा विजयाची चाहुल लागली होती, असंही त्यांनी नमूद केले.

अक्षयला ग्रामीण प्रश्नांची जाणपरदेशात शिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर अक्षय लगेच प्रचाराच्या कामात लागला. त्यालाही राजकारणाची आवड आहेच. निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या दिवशीचं अक्षयच्या परिक्षेचा निकाल लागला. त्यात त्याने चांगलेच यश मिळवले आहे. अक्षयने कृषी क्षेत्रात शिक्षण घेतल्यामुळे त्याला ग्रामीण प्रश्न समजून घेण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कार्यालयात तिघांपैकी एकजण हजर राहतोचजनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण राजकारणात आहोत. त्यामुळे कार्यालयात भेटायला आलेल्या प्रत्येकाची भेट घेण्यासाठी कुटुंबातील एक व्यक्त कायम कार्यालयात असतोच, असं संगीता गोरंट्याल यांनी सांगितले. त्यामुळे बऱ्याचदा कुटुंबासोबत एकत्र जाणे शक्य होत नाही. पण त्यातून मार्ग काढत काम करतोय. कार्यालयात कामानिमित्त आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भेटण्याचा कुटुंबाचा वारसाच असल्याचे त्या म्हणाल्या.