शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने आशेवर पाणी

By admin | Updated: March 17, 2017 01:06 IST

पोषक वातावरण व मुबलक पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामातील पिके जोमात असतानाच बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले

लातूर/उस्मानाबाद/बीड : पोषक वातावरण व मुबलक पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामातील पिके जोमात असतानाच बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. या पावसात बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांतील रब्बीतील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह आंबा, द्राक्षांच्या फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम गुरुवारी सुरू झाले. लातूर जिल्ह्यातील औसा, लातूर, निलंगा, उदगीर, देवणी, रेणापूर तालुक्यांतील अनेक गावांत रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर तालुक्यात ३ हजार ६०० हेक्टर, तर औसा तालुक्यात १९ हजार ८४० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत, असा प्राथमिक अंदाज आहे. लातूर तालुक्यात उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार संजय वारकड तसेच तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकाने नुकसानीची पाहणी केली. पंचनामा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांची समिती गठित केली आहे. आठ दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या समित्यांना दिले आहेत. शेत, गाव आणि पीकनिहाय याद्या तयार करून पंचनामे केले जाणार आहेत. गावचा ग्रामसेवक तसेच तलाठी, मंडळ अधिकारी आणि शेतकरी पंचनाम्यादरम्यान उपस्थित राहतील आणि पंचनाम्याचा अहवाल तहसीलदारांकडे प्रारंभी सादर होईल. तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर झाल्यानंतर तो शासनाकडे पाठविला जाणार आहे. तसे आदेश या समित्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात रब्बी पिकांसह फळबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, सुमारे ६ हजार ५७२ हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे. सुमारे ३ हजार ६२५ हेक्टरवरील ज्वारी आडवी झाली आहे. तसेच काढणीला आलेल्या गव्हाची लोळवण झाली आहे. दीड हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील हरभऱ्याचे नुकसान झाले आहे. तुळजापूर तालुक्यात द्राक्ष बागांचे प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक प्रमाण असून, जवळपास सोळा हेक्टवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे आंबा चोवीस, कांदा बारा, टरबूज-खरबूज तीस आणि २१ हेक्टवरील भाजीपाल्याचेही नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. बीड जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा तब्बल १२ हजार हेक्टरवरील पिकांना बसला आहे. बुधवारी जिल्ह्यात ६०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये बीड तालुक्यात १०.४५, पाटोदा १०.००, अंबाजोगाई २.२०, माजलगाव १.५०, केज १५.७१, धारूर १०.६७, परळी १०.०० अशी नोंद आहे. मंडळानुसार पावसामध्ये तफावत असली तरी वादळी वाऱ्याने ज्वारीची पडझड झाली आहे. फळबागांमध्ये आंबा व द्राक्षांच्या बागा कोलमडल्या आहेत. धारूर तालुक्यातील २८ गावशिवारातील १३४० हेक्टर, केज तालुक्यातील ३५०० हेक्टर, परळी तालुक्यातील ५००० हेक्टर असे जिल्हाभरातील जवळपास १५ हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. परळी तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी जिल्हाधिकारी राम यांनी गुरुवारी केली.