शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे..घुशी, उंदीर व खेकड्यांनीच फोडला कालवा : पाटबंधारे विभागाच्या अजब तर्काला महाजनांचा दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 17:12 IST

मुठा कालवा दुर्घटनेत ज्यांचे नुकसान झाले आहे.अशा सर्वांचे पंचनामे करुन पीडितांना त्याप्रमाणे मदत केली जाईल असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

ठळक मुद्देमुठा कालवा फुटी दुर्घटनेसंबंधी चौकशी समिती स्थापन करण्याचे गिरीश महाजन यांचे आदेश पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाणार जलसंपदामंत्री महाजन यांच्यासमोर टिळकांविषयी नागरिकांचा संताप

पुणे: खडकवासला धरणाचा मुठा कालवा गुरुवारी दांडेकर पुलाजवळ फुटल्याने या जलप्रलयात अनेकांचे संसार उध्वस्त झाले. कुणाचे पैसे, दागिने, संसारोपयोगी साहित्यसुध्दा या कालव्याच्या प्रवाहात वाहून गेले. डोळ्यांसमोर काही क्षणातच होत्याचे नव्हते घडले. या दुर्घटनेत अनेक कुटुंबे रस्त्यावर आली. परंतु, दुर्घटनेत ज्यांचे नुकसान झाले आहे.अशा सर्वांचे पंचनामे करुन पीडितांना त्याप्रमाणे मदत केली जाईल असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. या दुर्घटनेची संबंधी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश देखील त्यांनी यावेळी दिले.  महाजन यांनी शुक्रवारी (दि. २८ सप्टें) रोजी दुपारी दांडेकर पूल येथील दुर्घटना ग्रस्तांची भेट घेतली. भेटीदरम्यान आमदार माधुरी मिसाळ, बाबा मिसाळ आदी पदाधिकारी उपस्थितल होते. त्यावेळी ते बोलत होते. महाजन म्हणाले, हा कालवा फुटण्यापाठीमागे घुशी, उंदीरखेकडाच जबाबदार आहे असे मत पाटबंधारे विभागाने व्यक्त केले आहे. ते बरोबर असू शकते.परंतु, या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही दुर्घटना अतिशय वेदनादायी आहे. पीडित कुटुंबांना सरकार व महापालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.

दुर्घटनेत नुकसान झालेल्यांना पंचनामे करुन लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन देखील महाजन यांनी यावेळी दिले. पीडितग्रस्त कुटुंबांचे महाजन यांनी समस्या जाणून घेताना त्यांचे सांत्वन देखील केले. ज्यांची घरे कोसळली. त्यांचे ज्यांची घरे वाहून गेली किंवा कोसळली त्यांचे पंचनामे करुन त्यांना घरांची पुनर्बांंधणी करुन दिली जाईल. भेटी दरम्यान महापौर मुक्ता टिळक उपस्थित असल्याने पीडित नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. जलसंपदामंत्री महाजन यांच्यासमोर टिळकांविषयी संताप व्यक्त करताना नागरिक म्हणाले,  घटनास्थळी भेट देताना महापौरांनी गांभीर्य न बाळगता या उद्भवलेल्या विदारक परिस्थितीवर हसल्या असे सांगत टिळकांच्या चुकांचा अक्षरश: पाढाच वाचला. 

टॅग्स :PuneपुणेkalwaकळवाGirish Mahajanगिरीश महाजनWaterपाणीmula muthaमुळा मुठा