शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

‘गोल्डन अवर’मध्ये उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू

By admin | Updated: June 13, 2015 03:43 IST

पाऊण तास मिळाली नाही रुग्णवाहिका,हिंदुजा रुग्णालयाच्या बेपर्वाईमुळे अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रुग्णाला जीव गमवावा लागला.

मुंबई : प्रकृती चिंताजनक असताना आणि आत्यंतिक शारीरिक वेदना होत असतानाही रुग्णवाहिका तत्काळ पाठवण्याऐवजी प्रक्रियेत वेळ घालवणाऱ्या हिंदुजा रुग्णालयाच्या बेपर्वाईमुळे अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रुग्णाला जीव गमवावा लागला. हिंदुजा रुग्णालय आणि फॅमिली डॉक्टरकडून ‘गोल्डन अवर’मध्ये वैद्यकीय मदत न मिळाल्याने बन्सीधर बजाज यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे.घडले ते असे : रविवार, ७ जून स्थळ : सेन्स्ड अपार्टमेंट, युनियन पार्क, आंबेडकर रोड, खार (प.). वेळ : संध्या. ६.३० वा. बन्सीधर यांना छातीत दुखू लागले. त्या वेळी त्यांनी हाकेच्या अंतरावर असलेल्या  हिंदुजा रूग्णालयाला त्यांनी फोन केला. तत्काळ वैद्यकिय मदतीसाठी रूग्णवाहिका पाठवण्याचे सांगितले. मात्र तत्काळ मदत देण्याऐवजी रूग्णालयाकडून रूग्णाची मेडिकल हिस्ट्री विचारण्यात आली. रूग्णाचे नाव? वय यासह त्यांच्यावर चिकित्सा करणाऱ्या डॉक्टरचे नाव काय? त्यांची बायपास कधी झाली होती? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. एवढे करुनही त्यांची रुग्णवाहिका पोहोचलीच नाही, असे बन्सीधर यांचे लहान भाऊ सुंदरलाल बजाज यांनी ‘लोकमत’ला सांगितले.बजाज कुटुंबियांनी फॅमिली डॉक्टर रमेश मेहता यांच्याशीही संपर्क साधला. मात्र गोरेगावला सिनेमागृहात असल्याने येऊ शकत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तरीही बजाज कुटुंबियांनी बन्सीधर यांच्या गंभीर प्रकृतीची कल्पना देत त्यांना तत्काळ मदतीसाठी येण्याची विनंती केली. मात्र मेहता यांनी येण्यास असमर्थता दर्शवल्याचा आरोप बजाज कुटुंबाने केला आहे. हिंदुजा रूग्णालय आणि फॅमिली डॉक्टरकडून प्रतिसाद न मिळाल्याने एका नातेवाईकाने जीवनदायी रूग्णवाहिकेला (१०८ क्रमांक) फोन केला. त्यानंतर बजाज यांना रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र या सर्व प्रकारात सुमारे ४० ते ४५ मिनिटांचा वेळ खर्ची गेला.पण जीवनदायी रुग्णवाहिकेबरोबर आलेल्या डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. १० मिनिटे अगोदर वर्दी मिळाली असती तरी त्यांना वाचवता आले असते, असे जीवनदायी रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)