नियोजनाअभावी सांगली, कोल्हापूरमध्ये महापूर; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 12:36 AM2019-08-10T00:36:17+5:302019-08-10T00:36:45+5:30

नेरुळ येथे राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत सरकारवर टीका

Due to lack of planning, Sangli, Kolhapur is in great shape | नियोजनाअभावी सांगली, कोल्हापूरमध्ये महापूर; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

नियोजनाअभावी सांगली, कोल्हापूरमध्ये महापूर; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

Next

नवी मुंबई : सांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या महापुराचे कारण म्हणजे अलमट्टी धरण भरले आहे. धरणाचे दरवाजे उघडले तर कोयना धरणातून होणारा विसर्ग अलमट्टीकडे निघून जाईल, एवढे जर सरकारला कळत नसेल तर ही राज्यव्यवस्था सांभाळता कशाला? असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला लगावला आहे. गुरु वारी नेरुळ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबई कार्यकर्ता आढावा बैठकीत ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आमदार संदीप नाईक यांनी पक्षांतर केल्यानंतर माजी मंत्री गणेश नाईकही पक्षांतर करणार असून त्यांच्यासोबत शहरातील अनेक नगरसेवक पक्षांतर करणार आहेत, त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी कार्यकर्ता आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी आव्हाड यांनी नाईक यांच्यावर निशाणा साधत टीका केली. सत्तेसाठी नेत्यांनी जरी पक्षांतर केले तरी कार्यकर्ते कोठेही जात नसल्याचे आव्हाड म्हणाले.

नाईक यांच्याकडून अनेक वेळा अपमान झाला असून, पवारांसाठी मी खूप अपमान सहन केल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुबई शहराचा कधी इतिहास लिहिला गेला तर वसंतराव नाईक आणि शरद पवार ही नावे पुढे येतील. नवी मुंबईतील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास जागे करण्याचे आवाहन त्यांनी केले. किल्लारी येथे झालेल्या भूकंप दुर्घटनेच्या वेळी राबविण्यात आलेल्या मदतकार्यात सर्व परिस्थिती शरद पवार यांनी हाताळली होती, त्यामुळे अशा परिस्थितीचा त्यांना मोठा अनुभव आहे. उत्तराखंडमध्ये आलेल्या प्रलयानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी पवार यांच्यावर डिगास्टर मॅनेजमेंट सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर येथील महापुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी डिगास्टर मॅनेजमेंट सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवार यांच्याकडे द्यावी, असे आवाहन आव्हाड यांनी केले.

शरद पवार यांनी आजवर अनेक नेते मोठे केले असून त्यांनी पक्षाला सोडल्यानंतरही कार्यकर्ता जागेवरच राहिला असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रात पुढे जाण्यासाठी राष्ट्रवादीचे ताकदीचे नेते आणि पदाधिकारी फोडले जात आहेत, असे ते म्हणाले. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीतच राहण्याचे आवाहन त्यांनी केले. या आढावा बैठकीला राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष शेट्टी, राष्ट्रवादीचे नगरसेवक शंकर मोरे, नगरसेविका सपना गावडे, संगीता बोºहाडे, माजी नगरसेविका निर्मला गावडे, माजी नगरसेवक दिलीप बोºहाडे, विलास हुले, भालचंद्र नलावडे, भावना घाणेकर आदी मान्यवर आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्तेसाठी नेत्यांनी जरी पक्षांतर केले तरी कार्यकर्ते कोठेही जात नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले.

Web Title: Due to lack of planning, Sangli, Kolhapur is in great shape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.