शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डीएसके अजित पवारांच्या भेटीला, धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 13:20 IST

बांधकाम व्यावसायिक डी.एस कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीला गेल्याचं समजतं आहे.

मुंबई- बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये भरण्यासाठी अखेरची संधी देऊनही त्यांनी न्यायालयात रक्कम जमा न केल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला होता. सोमवारी हायकोर्टात यावर सुनावणी झाली होती. यानंतर आता बांधकाम व्यावसायिक डी.एस कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीला गेल्याचं समजतं आहे. मंगळवारी सकाळी डीएसकेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली.  धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन डीएसकेंनी अजित पवारांची भेट घेतल्याचं वृत्त आहे.

डी.एस कुलकर्णी व अजित पवार यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. आर्थिक संकटात सापडलेल्या डीएसकेंनी अजित पवार यांच्याशी आर्थिक संकटातून कसं बाहेर पडावं? याबद्दलची विचारणा केल्याचं समजतं आहे. त्यामुळे डीएसके व अजित पवार यांची भेट पुढे काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

भीक मागा, उधार घ्या; पण रिकाम्या हाती येऊ नका - उच्च न्यायालयभीक मागा, उधार घ्या; पण पुढील सुनावणीत रिकाम्या हाती येऊ नका, असं  न्यायालयाने डीएसकेंना सुनावलं. पुढील सुनावणीत डीएसके दाम्पत्याला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले.न्यायालयाने डीएसकेंसह पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागालाही (ईओडब्ल्यू) चांगलेच धारेवर धरले. डीएसकेंच्या मालमत्ता लिलावात काढण्यास उशीर का केला जात आहे, असा प्रश्नही न्यायालयाने तपास यंत्रणेला केला.न्या. साधना जाधव यांनी कुलकर्णी यांनी दिलेल्या आदेशानुसार मुदतीत डीएसके ५० कोटी रुपये जमा करू शकले नाहीत. सिंगापूरच्या प्रभुणे इंटरनॅशनल कंपनीने पैसे ट्रान्सफर केले, असे वकिलांनी सांगितले होते. मात्र सोमवारच्या सुनावणीत काही तांत्रिक कारणास्तव पैसे ट्रान्सफर न झाल्याचे अ‍ॅड. अशोक मुंदर्गी म्हणाले. परंतु, सरकारी वकिलांनी डीएसके मालमत्तेचा बाजारभाव फुगवून सांगत असल्याचे न्यायालयाला सांगितले.

उच्च न्यायालयाने यावेळी गुंतवणूकदारांचीही बाजू ऐकून घेतली. बहुतांशी गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना किमान मुद्दल तरी मिळाली पाहिजे. डीएसकेंची अटक की गुंतवणूकदारांचै पैसे परत मिळणे, यापैकी महत्त्वाचे काय आहे’, असा सवाल न्यायालयाने सरकारी वकिलांना केला. 

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडे