शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

कोरोनामुळे थांबवली ड्रंक अँड ड्राइव्ह कारवाई : पोलीस महासंचालकांचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 16:48 IST

कोरोनाचा विषाणू ड्रंक अँड ड्राइव्हच्या माध्यमातून अनेकांपर्यंत प्रसारित होऊ शकतो़ हा धोका

ठळक मुद्देब्रीथ अ‍ॅनलायझर न वापरण्याच्या सूचना

मुंबई : महामारी घोषित करण्यात आलेल्या कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये, म्हणून पोलिसांनी आणखी एक पाऊल उचलले आहे. त्यामुळे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईस अडथळा आला आहे. ड्रंक अँड ड्राइव्ह कारवाई करताना अर्थात ब्रीथ अ‍ॅनलायझरचा वापर पोलिसांनी करू नये, असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयातून जारी करण्यात आला आहे. पोलिसांना सोमवारी रात्री हे आदेश मिळाले आहेत.कोरोनाला महामारी असे घोषित केले गेले आहे़. तिच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. ड्रंक अँड डाइव्ह केसेस करताना वाहतूक शाखेचा पोलीस एकाच ब्रीथ अ‍ॅनलायझरमधून दिवसभरात अनेकांची तपासणी करतो. एकाच्या तोंडासमोरचे उपकरण पोलीस दुसऱ्याच्या, तिसऱ्याच्या असे अनेकांच्या तोंडासमोर धरतो. तसेच तो हे उपकरण स्वत:जवळ बाळगत असतो. त्यांना त्यात फूक मारायला सांगतात. यात जर एखादा कोरोनाबाधित असेल तर त्यातून कोरोनाचा विषाणू ड्रंक अँड ड्राइव्हच्या माध्यमातून अनेकांपर्यंत प्रसारित होऊ शकतो़ हा धोका लक्षात आल्याने पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून सोमवारी राज्यातील सर्व पोलीसप्रमुखांना आदेश पाठविण्यात आले असून, ब्रीथ अ‍ॅनलायझरचा वापर करणे थांबविण्यास सांगितले आहे.वाहतूक शाखेने दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी असा वाहनचालक दारू प्यायलेला आढळून आल्यास त्याची आवश्यकता वाटल्यास मेडिकल करावी, असेही या आदेशात म्हटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हfour wheelerफोर व्हीलरtwo wheelerटू व्हीलर