कराडजवळ पोल्ट्री शेडमधून ५५ कोटींचे ड्रग्ज जप्त! महसूल गुप्तचर विभागाची कारवाई; संशयीत ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 06:19 IST2026-01-26T06:19:08+5:302026-01-26T06:19:38+5:30

Satara crime News: कराड तालुक्यातील पाचुुपतेवाडी या गावात पोल्ट्री शेडमध्ये तयार होत असलेल्या अमली पदार्थ (ड्रग्ज) निर्मितीच्या कारखान्यावर पुणे विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआयआर) शनिवारी सायंकाळी छापा टाकला. यात ५५ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले.

Drugs worth Rs 55 crore seized from poultry shed near Karad! Revenue Intelligence Department takes action; Suspect in custody | कराडजवळ पोल्ट्री शेडमधून ५५ कोटींचे ड्रग्ज जप्त! महसूल गुप्तचर विभागाची कारवाई; संशयीत ताब्यात

कराडजवळ पोल्ट्री शेडमधून ५५ कोटींचे ड्रग्ज जप्त! महसूल गुप्तचर विभागाची कारवाई; संशयीत ताब्यात

कराड (जि. सातारा) - कराड तालुक्यातील पाचुुपतेवाडी या गावात पोल्ट्री शेडमध्ये तयार होत असलेल्या अमली पदार्थ (ड्रग्ज) निर्मितीच्या कारखान्यावर पुणे विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआयआर) शनिवारी सायंकाळी छापा टाकला. यात ५५ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले.

कराड तालुक्यातील डोंगरी भागात आणि कराड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाचुुपतेवाडी गावामध्ये एमडी ड्रग्ज तयार करणारा कारखाना सुरू होता.

अमली पदार्थांचा कारखाना... गावापासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या पोल्ट्री शेडमध्ये ड्रग्ज निर्मिती केली जात होती. डीआयआरच्या पथकाने शनिवारी सायंकाळी या शेडवर छापा टाकला. शेडमध्ये एमडी ड्रग्ज आणि कच्चा माल जप्त करण्यात आला, तसेच संशयितांना ताब्यात घेऊन पोल्ट्री शेड सील करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत अंदाजे ५५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

Web Title : कराड के पास पोल्ट्री शेड से 55 करोड़ के ड्रग्स जब्त!

Web Summary : सतारा के कराड के पास एक पोल्ट्री शेड में ड्रग्स फैक्ट्री पर छापा। ₹55 करोड़ के एमडी ड्रग्स जब्त, संदिग्ध हिरासत में। कारखाना पाचुुपतेवाड़ी गांव में चल रहा था, एकांत पोल्ट्री शेड में ड्रग्स का उत्पादन हो रहा था। राजस्व खुफिया निदेशालय (डीआरआई) द्वारा कार्रवाई।

Web Title : 55 Crore Drugs Seized Near Karad; Poultry Shed Drug Bust!

Web Summary : A drug factory was raided in a poultry shed near Karad, Satara. Authorities seized MD drugs worth ₹55 crore and detained suspects. The factory operated in Pachupatewadi village, producing drugs in a secluded poultry shed. The operation was conducted by the Directorate of Revenue Intelligence (DRI).