शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्रात ओला दुष्काळ, मराठवाडा कोरडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 10:59 IST

राज्यातील एका भागामधे जलसंकट घोंगावत असून, मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर विभागात मात्र वर्षभराची पाण्याची बेगमी होईल की नाही याची चिंता आहे.

ठळक मुद्देओला-सुका दुष्काळाचा खेळ : औरंगाबाद-अमरावती, नागपूर विभागात जेमतेम पाणी

पुणे : पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पाच जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, मराठवाड्यातील औरंगाबाद, अमरावती विभागांत पाण्याचा ठणठणाट असून, विदर्भातील नागपूर विभागामधे देखील पाणीबाणीची स्थिती आहे. अमरावतीमधे अवघा १८ टक्के पाणीसाठा आहे. कोकण, पुणे आणि नाशिक वगळता राज्यातील अनेक मोठ्या धरणांत अजूनही क्षमतेच्या निम्माही पाणीसाठा झालेला नाही.मॉन्सूनचा दोन महिन्यांचा काळ लोटला तरी मराठवाडा आणि विदर्भातील धरणात पुरेसा साठा नाही.

राज्याच्या दुसऱ्या भागामधे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यामधे दोन महिन्यांतच मॉन्सूनची सरासरी पार केली आहे. अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील सर्वात मोठे असलेले उजनी धरण (११७.४७ टीएमसी) पूर्ण क्षमतेने भरले आहे. उजनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने पंढरपुरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. राज्यातील एका भागामधे जलसंकट घोंगावत असून, मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर विभागात मात्र वर्षभराची पाण्याची बेगमी होईल की नाही याची चिंता आहे. जुलैच्या अखेरीपर्यंत औरंगाबाद विभागात क्षमतेच्या अवघा पाऊण टक्के साठा येथील धरणांत होता. नाशिकमधे झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे जायकवाडी (पैठण) धरणात क्षमतेच्या ६५ टक्के साठा झाला आहे. जवळपास ७७ टीएमसी पाणी जायकवाडीत जमा झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दुप्पट साठा आहे. औरंगाबाद विभागाचा विचार केल्यास तेथे क्षमतेच्या अवघा २१.९४ टक्केच साठा आहे. पैठण वगळता औरंगाबाद विभागातील बीडमधील मांजरा, हिंगोलीचे येलदरी, सिद्धेवर, नांदेडचे निम्म मनार, उस्मानाबादचा सिना, तेरणा आणि परभणीच्या दुधना प्रकल्पामधे पाण्याचा अक्षरश: खडखडाट आहे.राज्यातील विभागनिहाय पाणीसाठा (टीएमसीमध्ये)विभाग       एकूण          एकूण        आजचा                       टक्केवारी           उपयुक्त साठा    साठा         उपयुक्त साठाअमरावती    १४८.०६     १७६.३५      २७.३८                           १८.८औरंगाबाद    २६०.३१    ३२५.८२       ५७.११                           २१.९४कोकण        १२३.९४     १२९.६४      १०४.९९                        ८४.७१नागपूर       १६२.६७      १९७.०१       ४९.१७                        ३०.२३नाशिक       २१२            २४३.२३      १०९.६६                     ५१.७३पुणे            ५३७.१२       ६७४.९२       ४४४.७५                   ८२.८एकूण        १४४४.१३     १७१९.८२     ७९३                        ५४.९५

अमरावती विभागातही तीच स्थिती आहे. तेथे अवघा २२ टक्के पाणीसाठा आहे. अकोल्यातील वाणमधे क्षमतेच्या निम्मा, बुलडाण्याच्या पेनटाकळीमधे ४२ टक्के, यवतमाळच्या बेंबळा प्रकल्पात १८.२७ टक्के पाणसाठा आहे. या प्रकल्पातील मोठ्या प्रकल्पांमधेच पाणी नसल्याने येथेही वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो. नागपूर विभागातील भंडारा जिल्ह्यातील गोसी खुर्द या मोठ्या प्रकल्पात ४४ टक्के पाणीसाठा असून, गोंदियातील इटियाडोहला ५१ आणि निम्न वर्धा येथे २१ टक्के पाणीसाठा आहे. चंद्रपूरमधील ओसाळमेंढा पूर्ण क्षमतेने भरला आहे. नागपूरमधील तोतलाडोह या मोठ्या प्रकल्पात अवघा ०.१ टक्के साठा असून, विभागातील इतर ठिकाणी सरासरी पंचवीस ते तीस टक्केच पाणी आहे. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसdroughtदुष्काळFarmerशेतकरीweatherहवामान