शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

तापमानवाढीमुळे माेसमाचे चक्र बदलल्याने दुष्काळ, पाण्याची टंचाई; रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 07:51 IST

येल प्रोग्रॅम ऑन क्लायमेट चेंज कम्युनिकेशनच्या क्लायमेट ओपिनियन मॅप्स फॉर इंडियानुसार, देशस्तरावर ९१ टक्के लोकांनी जागतिक तापमानवाढीबाबत चिंता व्यक्त केली असली, तरी जागतिक तापमानवाढ ही मुख्यतः मानवी कृतींमुळे होत असल्याचे फक्त ५५ टक्के लोकांना वाटते.

मुंबई : राज्यातील ८७ टक्के नागरिकांनी जागतिक तापमानवाढीचे परिणाम स्वतः अनुभवल्याचे सांगितले असून, ७७ टक्के जणांना तापमानवाढीचा मान्सूनवर परिणाम होत असल्याचे वाटते. तर, ८२ टक्के जणांनी या समस्येमुळे दुष्काळ व पाणीटंचाई जाणवते, असे सांगितले. हे प्रमाण देशातील सर्वाधिक पातळीवरील असल्याचे येल प्रोग्रॅम ऑन क्लायमेट चेंज कम्युनिकेशनच्या क्लायमेट ओपिनियन मॅप्स फॉर इंडियाच्या अहवालातून समोर आले.

सप्टेंबरमध्ये राज्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि पुरामुळे ११ जणांचा मृत्यू झाला. अनेक जिल्ह्यांतील जीवन विस्कळीत झाले. बदलत्या हवामानाचा शहरे आणि शेतकऱ्यांवर परिणाम होत आहे. अनियमित पाऊस आणि मान्सूनचा बदललेला पॅटर्न यामुळे पिकावर परिणाम होत असून, मुंबईपासून मराठवाड्यापर्यंतच्या नागरी पायाभूत सुविधांवर ताण येत आहे. 

९० टक्के दिवस तीव्र हवामानाच्या घटना२०२४ मध्ये भारतात ३२२ दिवस म्हणजे वर्षभरातील ९०% दिवस तीव्र हवामानाच्या घटना नोंद झाल्या.  राष्ट्रीय स्तरावर, बहुतेक लोकांनी १२ महिन्यांत तीव्र उष्णतेच्या लाटा (७१ टक्के), शेतीवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव (५९ टक्के), वीजपुरवठा खंडित होणे (५९ टक्के), पाण्याचे प्रदूषण (५३ टक्के), दुष्काळ व पाण्याची टंचाई (५२ टक्के) आणि तीव्र हवा प्रदूषण (५१ टक्के) यांचा वैयक्तिक अनुभव आल्याचे सांगितले.

हवामानाच्या घटनांमध्ये वाढ होत असून, विविध राज्यांतील आणि जिल्ह्यांतील लोक वातावरण बदलाबाबत काय विचार करतात आणि त्यांचा अनुभव काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. - डॉ. जगदीश ठाकर, प्रकल्प प्रमुख

तापमानवाढीबाबत भारतीयांना काय वाटते?

तीव्र उष्णतेच्या लाटा    ७८%दुष्काळ व पाणीटंचाई    ७७%तीव्र चक्रीवादळे    ७३%मोठ्या पुरांच्या घटना    ७०%

English
हिंदी सारांश
Web Title : Climate Change Disrupts Weather, Fuels Droughts: Report Reveals Maharashtra's Plight

Web Summary : Maharashtra faces rising droughts and water scarcity due to climate change. A report indicates that 87% of citizens have experienced its effects, with 82% linking it to drought and water shortages. Extreme weather events impacted lives and agriculture.
टॅग्स :weatherहवामान अंदाज