शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

पवारांकडून दुष्काळाचे राजकारण - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 03:45 IST

‘राफेल’सह ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केल्याने आपणाला शरद पवार यांची चिंता वाटते. आता तर त्यांनी दुष्काळाबाबत सरकारवर टीका केली.

कोल्हापूर : ‘राफेल’सह ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केल्याने आपणाला शरद पवार यांची चिंता वाटते. आता तर त्यांनी दुष्काळाबाबत सरकारवर टीका केली. अपुऱ्या माहितीच्या आधारे वातावरण विचलित करण्याचे काम ते करीत असून, दुष्काळासारख्या संकटाला राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे सामोरे जायला पाहिजे; पण दुर्दैवाने पवार दुष्काळाचे राजकारण करीत असल्याचा पलटवार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.पाटील म्हणाले, मागील वर्षी जून, जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्याने बंपर पीक येईल असे वाटत असतानाच आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारली. त्यामुळे मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्टÑातील काही तालुके आणि विदर्भातील बुलडाणा जिल्ह्याला त्याचा फटका बसला. दुष्काळाच्या झळा या भागाला बसू नयेत, म्हणून आम्ही आॅक्टोबरमध्येच दुष्काळी तालुके जाहीर केले. त्यानंतर लगेच केंद्राचे पथक आले आणि १५१ तालुके दुष्काळी जाहीर करून ४७०० कोटींचा निधी मंजूर केला.अ‍ॅपद्वारे छावण्यांतील भ्रष्टाचाराला पायबंदजनावरांच्या कानाला एक टॅग लावून रोज अ‍ॅपद्वारे जनावरांची हजेरी घेतली जाणार आहे. त्यानंतर रोजची संख्या जिल्हाधिकाऱ्यांना कळविली जाईल, त्यानुसारच निधी वितरीत केला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.गृहखात्याच्या सूचनेनुसारचमंत्रालयाच्या पायºया काढल्यामंत्रालयाच्या परिसरात गाड्याही जात नव्हत्या. आगीसारखे प्रसंग उद्भवले तर सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथील पायºया काढण्याची सूचना गृह विभागाने दिली होती. त्यानुसार तीन ‘आयएएस’ अधिकाºयांची समिती नेमून पायºया काढण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती पाटील यांनी दिली.दृष्टिपथात उपाययोजनामागेल तिथे चारा छावणी, १,२६४ छावण्यांत ८ लाख ३२ हजार २९ जनावरे.टँकरची स्थिती : ३,६९९ गावे व ८,४१७ वाड्यांत ४,७७४ टँकरद्वारे पाणी पुरवठा. कोकणात ८६, खान्देशात १,१४९, पुणे विभागात ७५७, औरंगाबाद विभागात २,५३४, अमरावती २१८ तर नागपुरात ३० टॅँकर सुरू आहेत.चारा : अहमदनगर ४७१, पुणे १११, मराठवाड्यात ६८२ छावण्यांत ८ लाख ३२ हजार २९ जनावरे. प्रतिदिनी मोठ्या जनावरांना ९०, तर लहान जनावरांना ४५ रुपये अनुदान.शेती : चालू वीज बिलात ६७३.४१ कोटींची (३३.५ टक्के) सवलत. ६७ लाख ३० हजार ८६५ शेतकºयांना ४४१२ कोटींच्यामदतीचे वाटप. थकीत वीजबिलापोटी बंद असलेल्या ३३२० पाणी योजना पूर्ववत.रोजगार : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत ३४ हजार ४३१ कामे सुरू. त्यांवर २ लाख ७४ हजार ६४३ मजूरउपस्थित.सरकारचे दुष्काळावरील उपाययोजनांकडे दुर्लक्ष, भारतीय किसान संघाचा घरचा अहेरसांगोला (जि. सोलापूर): सरकारकडून दुष्काळासंदर्भात उपाययोजना न करता जनतेला मदतीपासून वंचित ठेवले जात आहे. कामचुकार लपवण्यासाठी निवडणूक व आचारसंहितेची ढाल पुढे केली जात आहे. या सुस्त यंत्रणेला जागे करण्यासाठी तीव्र आंदोलन उभे करण्याची भूमिका भारतीय किसान संघाने घेतल्याची माहिती प्रांताध्यक्ष बळीराम सोळंके यांनी दिली.भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र प्रांतिक कार्यकारिणीची चिंतन बैठक झाली. बैठकीला संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी, रावसाहेब शहाणे-पाटील आदी उपस्थित होते.रत्नागिरी महामार्गाचे काम सुरू असून या कामात भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये अक्षम्य त्रुटी असून जमिनीच्या मोबदल्यासाठी केलेले निवाडे सदोष आहेत. त्यामुळे आंदोलन करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. आॅक्टोबरमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रशासनाला रस्ते, वीज, पाणी, बाजारभाव आदी प्रश्नांवर धारेवर धरले जाईल. शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी परिषद भरविण्याचे ठरले, असे संघटनमंत्री दिनेश कुलकर्णी यांनी सांगितले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारdroughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र