मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढा, अन्यथा...; उदयनराजेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 18:16 IST2020-09-11T18:16:02+5:302020-09-11T18:16:45+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले घटनापीठ मराठा आरक्षणावर ( Maratha Reservation) सुनावणी करणार आहे.

मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढा, अन्यथा...; उदयनराजेंचा इशारा
सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2018 साली बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली. ज्यांना यापूर्वी या आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्याला धक्का लागणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आता मराठा आरक्षणावरून ( Maratha Reservation) राजकारण सुरू झालं आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ( Chhatrapati Udayanraje Bhonsle) यांनी, मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढा, अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जा!, अशी प्रतिक्रिया देत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
...तर कुणी आंदोलन करेल असं वाटत नाही; मराठा आरक्षण स्थगितीवर शरद पवारांनी सुचवला तोडगा
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य सरकारविरोधात एल्गार; सोमवारपासून करणार ढोल बजाओ आंदोलन
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ट्विट केलं की,''सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते.''
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते.https://t.co/iQ8iYCpLLPpic.twitter.com/pSKdYnQBz5
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 11, 2020
ते पुढे म्हणाले की,''मी सरकारला एकच सांगू इच्छितो. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती तसेच नोकरभरतीतले आरक्षण कायम ठेवावे यासाठी सरकारने तातडीने अद्यादेश काढावा. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे.''
मी सरकारला एकच सांगू इच्छितो. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती तसेच नोकरभरतीतले आरक्षण कायम ठेवावे यासाठी सरकारने तातडीने अद्यादेश काढावा. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. pic.twitter.com/G0HVeDqxwa
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 11, 2020
''मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू. या लढ्यात मराठा समाजासोबत मी आहे हे सरकारने लक्षात ठेवावे,''असेही ते पुढे म्हणाले.
मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू. या लढ्यात मराठा समाजासोबत मी आहे हे सरकारने लक्षात ठेवावे.
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 11, 2020
मराठा आरक्षणाचे भवितव्य घटनापीठाच्या निर्णयावरून ठरणार
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षण प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले घटनापीठ मराठा आरक्षणावर सुनावणी करणार आहे. आता मराठा आरक्षणाचे भवितव्य आता घटनापीठाच्या निर्णयावरून ठरणार आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020त सुरेश रैनाच्या जागी CSK ट्वेंटी-20तील नंबर वन खेळाडूला ताफ्यात घेणार?
IPLमधील सर्वोत्तम कर्णधार कोण? आकडेवारी सांगते रोहित शर्मा अन् MS Dhoni नव्हे, तर...
Indian Premier League 2020मधील टॉप 10 महागड्या खेळाडूंत केवळ चार भारतीय!
आठ दिवसांवर आली IPL 2020; जाणून घेऊया असे 8 विक्रम जे मोडणे अशक्यच!