...तर कुणी आंदोलन करेल असं वाटत नाही; मराठा आरक्षण स्थगितीवर शरद पवारांनी सुचवला तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 05:39 PM2020-09-11T17:39:51+5:302020-09-11T17:40:27+5:30

मराठा आरक्षणात केंद्र आणि राज्य सरकार असा वाद आणण्याची गरज नाही, शरद पवार

A solution suggested by Sharad Pawar on the postponement of Maratha reservation | ...तर कुणी आंदोलन करेल असं वाटत नाही; मराठा आरक्षण स्थगितीवर शरद पवारांनी सुचवला तोडगा

...तर कुणी आंदोलन करेल असं वाटत नाही; मराठा आरक्षण स्थगितीवर शरद पवारांनी सुचवला तोडगा

googlenewsNext

सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2018 साली बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली. ज्यांना यापूर्वी या आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्याला धक्का लागणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यानंतर आता मराठा आरक्षणावरून राजकारण सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी, मराठा आरक्षणात केंद्र आणि राज्य सरकार असा वाद आणण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत मांडताना तोडगाही सूचवला. ( मराठा आरक्षण) 

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य सरकारविरोधात एल्गार; सोमवारपासून करणार ढोल बजाओ आंदोलन

दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि देशातील विविध घडामोडींबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर शरद पवार यांनी त्यांची मतं व्यक्त केली. त्यांनी म्हटले की,'' आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला ५० टक्क्यांवर अधिकचे १० टक्के आरक्षण देण्यासाठी संसदेत कायद्यात सुधारणा करण्यात आली. हा निर्णयही न्यायालयाधीन असल्याने तो काही वेगळा लागेल, असे वाटत नाही. पण तरीही हे आरक्षण कसे टिकेल व मुलांना न्याय कसा मिळेल, यावर मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न राहील.'' ( मराठा आरक्षण)


ते पुढे म्हणाले की,'' मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर अध्यादेश काढणे हा मार्ग असू शकतो. कायदेशीर सल्लागारांनी हे संमत केले तर कोणी आंदोलन करण्याची भूमिका घेईल, असे मला वाटत नाही. मराठा आरक्षणात केंद्र आणि राज्य सरकार असा वाद आणण्याची गरज नाही, असे माझे मत आहे.'' ( मराठा आरक्षण)

महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास- रोहित पवार
"महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. अंतिम निकाल हा आरक्षणाच्याच बाजूने लागेल असा विश्वास आहे. यात कुणीही राजकारण करु नये" असं रोहीत यांनी म्हटलं आहे. "मराठा आरक्षण व केंद्र सरकारने खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी दिलेलं 10% आरक्षण हे दोन्ही प्रकरणं सर्वोच्च न्यायालयाने घटना पीठाकडं सोपवले. पण तसं करताना फक्त मराठा आरक्षणालाच स्थगिती दिली, हे धक्कादायक आहे. तरी #MVA सरकार व न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास आहे" असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. ( मराठा आरक्षण)

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020त सुरेश रैनाच्या जागी CSK ट्वेंटी-20तील नंबर वन खेळाडूला ताफ्यात घेणार? 

IPLमधील सर्वोत्तम कर्णधार कोण? आकडेवारी सांगते रोहित शर्मा अन् MS Dhoni नव्हे, तर... 

Indian Premier League 2020मधील टॉप 10 महागड्या खेळाडूंत केवळ चार भारतीय!

आठ दिवसांवर आली IPL 2020; जाणून घेऊया असे 8 विक्रम जे मोडणे अशक्यच!

Read in English

Web Title: A solution suggested by Sharad Pawar on the postponement of Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.