शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

राज्यातील आरटीई प्रवेशासाठी दुप्पट अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 11:25 IST

राज्यातील ९ हजार ३३१ शाळांमधील आरटीईच्या जागांसाठी शिक्षण विभागाकडे २९ फेब्रुवारीपर्यंत २ लाख ८१ हजार ४०१ अर्ज प्राप्त झाले आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर आरटीईत मागे;  पुण्यात तीनपट, तर नागपुरात पाचपट अर्जशिक्षण विभागाने १२ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्जप्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपली असली, तरी अर्ज कन्फर्म करण्यासाठी येत्या ४ मार्चपर्यंत मुदत

पुणे : राज्यातील आरटीई प्रवेशाच्या एकूण १ लाख १५ हजार २९८ जागांसाठी एकूण २ लाख ८१ हजार ४०१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत. त्यात पुण्यातील १७ हजार जागांसाठी ६० हजार विद्यार्थ्यांनी, तर नागपूरमधील ६ हजार जागांसाठी ३० हजार विद्यार्थ्यांनी आणि औरंगाबादमधील ५ हजार जागांसाठी १५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत; मात्र प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपली असली, तरी अर्ज कन्फर्म करण्यासाठी येत्या ४ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिला जातो. त्यासाठी शिक्षण विभागाने १२ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले होते. राज्यातील ९ हजार ३३१ शाळांमधील आरटीईच्या जागांसाठी शिक्षण विभागाकडे २९ फेब्रुवारीपर्यंत २ लाख ८१ हजार ४०१ अर्ज प्राप्त झाले आहेत. कोल्हापूर वगळता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत.कोल्हापूर जिल्हा आरटीई प्रवेशात मागे असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी ३४५ शाळांनी नोंदणी केली असून, या शाळांमध्ये आरटीईच्या ३ हजार ४८६ जागा उपलब्ध आहेत. मात्र, या जागांसाठी केवळ २ हजार ८०७ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४७ जागांसाठी ३६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. नागपूर जिल्ह्यात ६ हजार ७९७ जागा असून, या जागांच्या पाच पट म्हणजे ३० हजार ५५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत..............राज्याच्या शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेश अर्ज भरण्यासाठी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, अर्ज कन्फर्म न केलेल्या विद्यार्थ्यांना किंवा काही कारणास्तव अर्ज भरायचा राहून गेला असल्यास संबंधित विद्यार्थ्यांना येत्या ४ मार्चपर्यंत अर्ज भरता येईल. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा.- दिनकर टेमकर, सहसंचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य.........................

आरटीई प्रवेशाची आकडेवारी जिल्हा     प्रवेशाच्या       प्राप्त झालेले                     जागा                अर्ज पुणे            १७,०५७            ६०,५२०नागपूर        ६,७९७            ३०,०५५नाशिक        ५,५५३            १७,०७०औरंगाबाद    ५,०४३            १५,९३३ठाणे            १२,९१५          १९,४२१मुंबई           ५,७७१             १२,१५१................ 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण