राज्यातील आरटीई प्रवेशासाठी दुप्पट अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 11:21 AM2020-03-02T11:21:36+5:302020-03-02T11:25:17+5:30

राज्यातील ९ हजार ३३१ शाळांमधील आरटीईच्या जागांसाठी शिक्षण विभागाकडे २९ फेब्रुवारीपर्यंत २ लाख ८१ हजार ४०१ अर्ज प्राप्त झाले आहेत.

Double application form for RTE admission in the state | राज्यातील आरटीई प्रवेशासाठी दुप्पट अर्ज

राज्यातील आरटीई प्रवेशासाठी दुप्पट अर्ज

Next
ठळक मुद्देकोल्हापूर आरटीईत मागे;  पुण्यात तीनपट, तर नागपुरात पाचपट अर्जशिक्षण विभागाने १२ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्जप्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपली असली, तरी अर्ज कन्फर्म करण्यासाठी येत्या ४ मार्चपर्यंत मुदत

पुणे : राज्यातील आरटीई प्रवेशाच्या एकूण १ लाख १५ हजार २९८ जागांसाठी एकूण २ लाख ८१ हजार ४०१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत. त्यात पुण्यातील १७ हजार जागांसाठी ६० हजार विद्यार्थ्यांनी, तर नागपूरमधील ६ हजार जागांसाठी ३० हजार विद्यार्थ्यांनी आणि औरंगाबादमधील ५ हजार जागांसाठी १५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत; मात्र प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपली असली, तरी अर्ज कन्फर्म करण्यासाठी येत्या ४ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिला जातो. त्यासाठी शिक्षण विभागाने १२ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले होते. 
राज्यातील ९ हजार ३३१ शाळांमधील आरटीईच्या जागांसाठी शिक्षण विभागाकडे २९ फेब्रुवारीपर्यंत २ लाख ८१ हजार ४०१ अर्ज प्राप्त झाले आहेत. कोल्हापूर वगळता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत.
कोल्हापूर जिल्हा आरटीई प्रवेशात मागे असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी ३४५ शाळांनी नोंदणी केली असून, या शाळांमध्ये आरटीईच्या ३ हजार ४८६ जागा उपलब्ध आहेत. मात्र, या जागांसाठी केवळ २ हजार ८०७ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४७ जागांसाठी ३६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. 
नागपूर जिल्ह्यात ६ हजार ७९७ जागा असून, या जागांच्या पाच पट म्हणजे ३० हजार ५५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.
.............
राज्याच्या शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेश अर्ज भरण्यासाठी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, अर्ज कन्फर्म न केलेल्या विद्यार्थ्यांना किंवा काही कारणास्तव अर्ज भरायचा राहून गेला असल्यास संबंधित विद्यार्थ्यांना येत्या ४ मार्चपर्यंत अर्ज भरता येईल. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा.- दिनकर टेमकर, सहसंचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य.
........................

आरटीई प्रवेशाची आकडेवारी
 जिल्हा     प्रवेशाच्या       प्राप्त झालेले 
                    जागा                अर्ज 
पुणे            १७,०५७            ६०,५२०
नागपूर        ६,७९७            ३०,०५५
नाशिक        ५,५५३            १७,०७०
औरंगाबाद    ५,०४३            १५,९३३
ठाणे            १२,९१५          १९,४२१
मुंबई           ५,७७१             १२,१५१
................
 

Web Title: Double application form for RTE admission in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.