शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

अखेर दारे उघडणार; ज्ञानाची ४ ऑक्टोबर, तर देवाची ७ ऑक्टोबरला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 6:28 AM

पालक संघटना, शिक्षण तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याची भूमिका मांडली होती. मुलांच्या भावनिक वाढीच्या दृष्टीनेही प्रत्यक्ष शाळा सुरू करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी राज्य शासनास दिले होते. 

मुंबई : राज्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर धार्मिक स्थळे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून, तर ज्ञानाची मंदिरं असणाऱ्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी हे निर्णय जाहीर केले. मंदिरांच्या कळस दर्शनावर गेली कित्येक महिने समाधान मानाव्या लागणाऱ्या भक्तांना, तसेच शाळा उघडण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे.

पालक संघटना, शिक्षण तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याची भूमिका मांडली होती. मुलांच्या भावनिक वाढीच्या दृष्टीनेही प्रत्यक्ष शाळा सुरू करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी राज्य शासनास दिले होते. 

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शाळा उघडण्याचा निर्णय घेतला. ऑगस्टमध्ये शाळा सुरू करण्याचा एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, राज्यात तिसरी लाट येण्याच्या भीतीने तो स्थगित झाला. तथापि, आता गणेशोत्सवानंतर रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात कुठेही वाढ झालेली दिसली नाही. 

उलट रूग्णसंख्या कमी होत आहे. राज्याचा रूग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के असून बहुतांश लोकांचे लसीकरण झाले आहे. शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी आधीपासूनच प्रयत्न करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जुलैमध्ये कोरोनामुक्त ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. 

मुलांना उपस्थिती बंधनकारक नाहीमुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल. विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक नसेल तसेच  शाळेत येण्याची सक्ती करण्यात येणार नाही. शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य राहील. 

खेळांना मात्र बंदीशाळा सुरू होतील, पण सध्याच कोणतेही खेळ घेता येणार नाहीत, असे शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर काही खेळ घेण्यास हरकत नसेल. तथापि, जवळून संबंध येईल असे खेळ जसे खो-खो, कबड्डी हे टाळले जातील. 

भाविकांची इच्छापूर्तीधार्मिक स्थळे कधी उघडणार याबाबत उत्सुकता होती. अखेर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त साधत सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्र्यांनी समस्त भाविकांची इच्छापूर्ती केली आहे. धार्मिक स्थळे खुली करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासन येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर करण्याची शक्यता आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करूनच धार्मिक स्थळे खुली करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

‘या’ विद्यार्थ्यांची घेणार विशेष काळजी- शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या मनोवस्थेत बदल झाला असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विभागाने विद्यार्थ्यांची मानसिक काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

- वर्गात शांत बसणारे, कोणत्याही गोष्टीत स्वारस्य न दाखविणारे, जास्त चिडचिड करणारे, रागीट व छोट्याशा गोष्टीने निराश होणारे, वयाशी विसंगत वर्तणूक करणारे, खाण्याच्या व झोपण्याच्या सवयींमध्ये बदल दर्शविणारे, असहाय्य व सतत रडणारे अशा विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्यात येईल. 

अशा आहेत मार्गदर्शक सूचना -- एखादा विद्यार्थी आजारी असेल, त्याला आजाराची लक्षणे दिसत असतील तर तातडीने उपाययोजना करण्यात येतील. - मुलांना गणवेशाची सक्ती नसेल. घरच्या कपड्यांवरही शाळेत जाता येईल.- प्रत्येक शाळेत शक्य असल्यास हेल्थ क्लिनिक. विद्यार्थ्यांचे तापमान नियमितपणे तपासावे.- इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घ्यावी. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. मुलांना शाळेत पायी येण्यासाठी प्रोत्साहित करावे.- ज्या शाळांमध्ये स्कूलबस, खासगी वाहनांद्वारे विद्यार्थी येतात, अशा वाहनांमध्ये एका सिटवर एकच विद्यार्थी प्रवास करेल याची दक्षता घ्यावी. - सॅनिटायझरचा वापर करावा. - विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाइन सादर करावा. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची अदलाबदल होणार नाही.- गृहपाठ शक्यतो वर्गामध्येच करून घ्यावा. मुलांना कमीतकमी पुस्तके/वह्या आणाव्या लागतील, अशी व्यवस्था असावी, असे सांगण्यात आले आहे.- सीएसआर फंडांतून शाळांनी पंखे, सॅनिटायझर, वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करावीत. अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. 

टॅग्स :SchoolशाळाState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेStudentविद्यार्थीTeacherशिक्षक