ठाणे - उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा अजितदादा पवार यांनी घ्यावी हा राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय होता परंतु शिंदेसेनेचे नेते रामदास कदम आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबाबत जी अभद्र टिप्पणी करत आहेत. आम्ही देखील रामदास कदम तुम्हाला त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विधिमंडळात आपल्यावर केलेले आरोप आणि तुमच्या कुटुंबांचे असलेले डान्सबार याबाबत आम्हाला बोलायला लावू नका. आम्ही नेहमी राष्ट्रवादी युती म्हणून पालन केले आहे. सुनील तटकरे यांनी देखील युतीधर्माचे पालन केले आहे. रामदास कदम आपण कुठलीही अभद्र टिप्पणी करू नये नाहीतर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची भूमिका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली आणि पक्ष एनडीएमध्ये सामील झाला. त्यामुळे ज्यांना विलीनीकरणाची घाई लागली आहे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही आनंद परांजपे यांनी केली आहे. दरम्यान वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असे सांगतानाच जितेंद्र आव्हाड यांनी काय भूमिका घ्यावी याबाबत शरद पवार गटाचा निर्णय असेल असेही आनंद परांजपे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.
आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आमचे दैवत अजितदादा पवार आमच्यातून निघून गेल्याने आम्ही दुःखात आहोत. दुःखातून आम्ही सावरलेलो नाही. त्यामुळे राज्यसभेत जाण्यासाठी योग्य वेळी पक्ष नेतृत्व निर्णय घेईल असेही आनंद परांजपे म्हणाले.
दादांच्या अपघाताची सीआयडीमार्फत चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावली असून ही संपूर्ण माहिती महाराष्ट्रासमोर येण्याची गरज आहे. खासदार बजरंग सोनावणे यांच्या मनात संशय असेल तर त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट घ्यावी .जबाबदार व्यक्तीने बेजबाबदार वक्तव्य करू नये, असा टोला लगावतानाच केंद्र आणि महाराष्ट्रामार्फत चौकशी सुरू आहे याची आठवण आनंद परांजपे यांनी करुन दिली.
Web Summary : Anand Paranjape cautioned Ramdas Kadam against offensive remarks about Sunil Tatkare. He referenced past allegations against Kadam and emphasized the Nationalist Congress Party's unity. Paranjape also addressed inquiries about Ajit Pawar's accident investigation and party decisions.
Web Summary : आनंद परांजपे ने रामदास कदम को सुनील तटकरे पर अभद्र टिप्पणी करने के खिलाफ चेतावनी दी। उन्होंने कदम पर पहले के आरोपों का हवाला दिया और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की एकता पर जोर दिया। परांजपे ने अजित पवार की दुर्घटना जांच और पार्टी के फैसलों पर भी बात की।