अजित पवार कुठे आहेत माहिती नाही...; शरद पवारांसोबत एकाच स्टेजवर येण्यावरून भुजबळांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:43 IST2025-01-03T11:43:34+5:302025-01-03T11:43:53+5:30

आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यामुळे त्यांच्या जन्मगावी नायगावला गेल्या 20 वर्षांपासून जातो, आज विशेषतः मुख्यमंत्री आणि इतर मंत्री येत आहेत, असे भुजबळ म्हणाले. 

Don't know where Ajit Pawar is...; chagan Bhujbal's reaction on being on the same stage with Sharad Pawar at Savitribai Phule Jayanti | अजित पवार कुठे आहेत माहिती नाही...; शरद पवारांसोबत एकाच स्टेजवर येण्यावरून भुजबळांची प्रतिक्रिया

अजित पवार कुठे आहेत माहिती नाही...; शरद पवारांसोबत एकाच स्टेजवर येण्यावरून भुजबळांची प्रतिक्रिया

आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यामुळे त्यांच्या जन्मगावी नायगावला गेल्या 20 वर्षांपासून जातो, आज विशेषतः मुख्यमंत्री आणि इतर मंत्री येत आहेत. पुण्यातील भिडे वाडा स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. शरद पवार आणि मी एकत्र व्यासपीठावर आहोत हे खरे आहे. पण अजित पवार कुठे आहेत हे मला माहिती नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटातील नाराज नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. 

चाकणला सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभे केले आहेत. त्या कार्यक्रमाला शरद पवार आणि मला आमंत्रित करण्यात आले आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जिथे कार्यक्रम असतो तिथे मी जात असतो. अजित पवार कुठे आहे मला माहिती नाही. ते मुंबईत असतील तर कार्यक्रमाला येतील, बाहेर असतील तर येणार नाहीत, असे भुजबळ म्हणाले. 

आजच्या नायगाव येथील कार्यक्रमाला फडणवीसही येणार आहेत. यावेळी भेट झाली तर काय चर्चा होईल यावर विचारले असता भुजबळांनी काहीशी नकारात्मक प्रतिक्रिया दिली. हजारो लोक सावित्रीबाई फुले कार्यक्रमासाठी येणार आहेत. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री देखील असणार, तिथे काय राजकीय चर्चा काय होणार? असा सवाल भुजबळांनी केला आहे. 

आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यामुळे त्यांच्या जन्मगावी नायगावला गेल्या 20 वर्षांपासून जातो, आज विशेषतः मुख्यमंत्री आणि इतर मंत्री येत आहेत, असे भुजबळ म्हणाले. 

Web Title: Don't know where Ajit Pawar is...; chagan Bhujbal's reaction on being on the same stage with Sharad Pawar at Savitribai Phule Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.