मुंबई : भाजप-शिवसेना युतीबाबत सगळे ठरलेले आहे. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांवर जाऊ नका, मुख्यमंत्रीपदाबाबत माध्यमांशी तुम्ही बोलू नका, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजप-शिवसेना आमदारांच्या बैठकीत दिल्या. विधानभवनात ही बैठक झाली. यावेळी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांचा सत्कार करण्यात आला.आम्ही एक आहोत आणि युती घट्ट असून विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणेच सामोरे जाऊ, अशी ग्वाही फडणवीस आणि ठाकरे यांनी दिली. ठाकरे म्हणाले की, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मी व मुख्यमंत्री यांचे युतीबाबत सगळे ठरले आहे. कुणाला काहीही बोलू द्या, युती पक्की आहे. दोन्ही पक्षांचे नेते-कार्यकर्ते लोकसभा निवडणूक एकदिलाने लढले तीच एकी विधानसभा निवडणुकीतही दाखवायची आहे, दोघांनीही सांगितले.
मुख्यमंत्रीपदाबाबत बोलू नका; फडणवीस-ठाकरेंच्या सूचना, युती घट्ट असल्याचा निर्वाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 04:42 IST