भरती प्रक्रियेवेळी प्रलोभनांना भुलू नका , एसटी महामंडळाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 03:00 AM2019-05-07T03:00:20+5:302019-05-07T03:01:01+5:30

एसटी महामंडळाकडून सुरू असलेल्या चालक तथा वाहक पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवार व त्यांच्या नातेवाइकांनी प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे भरती प्रक्रियेला सामोरे जावे, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना केले आहे.

Do not forget temptations during the recruitment process, ST corporation appeals | भरती प्रक्रियेवेळी प्रलोभनांना भुलू नका , एसटी महामंडळाचे आवाहन

भरती प्रक्रियेवेळी प्रलोभनांना भुलू नका , एसटी महामंडळाचे आवाहन

Next

मुंबई - एसटी महामंडळाकडून सुरू असलेल्या चालक तथा वाहक पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवार व त्यांच्या नातेवाइकांनी प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे भरती प्रक्रियेला सामोरे जावे, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना केले आहे. तसेच उमेदवारांना भरती प्रक्रियेबाबत काही शंका असल्यास किंवा तक्रार करायची असल्यास सबळ पुराव्याच्या आधारे ते १८००१२१८४१४ या नि:शुल्क दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करू शकतात, असे एसटी महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या चार वर्षांमध्ये एसटी महामंडळामार्फत पारदर्शक पद्धतीने विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष, स्वत: प्रत्येक भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कोणत्याही पदाच्या भरती प्रक्रियेत अध्यक्षासहित कोणाचाही वशिला चालणार नाही. तसेच इतर प्रलोभने अथवा कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे एसटी महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

२४ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्याच्या २१ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८ हजार २२ चालक तथा वाहक पदासाठी लेखी परीक्षा पार पडली. त्यातील उत्तीर्ण उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी आणि शारीरिक क्षमता चाचणी प्रक्रिया सुरू असून, यापैकी पात्र उमेदवारांना संगणकीय चालन परीक्षेसाठी बोलाविण्यात येणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा आणि संगणकीय चालन परीक्षा यांच्या संयुक्त गुण तालिकेनुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तथापि कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक पात्रतेमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना काही लोकांकडून नियमबाह्यरीत्या काम करून अंतिम निवड यादीत नाव समाविष्ट करण्याचे आमिष संबंधित एजंटकडून दाखविण्यात येत असल्याच्या तक्रारी एसटी महामंडळाच्या अध्यक्षांना दूरध्वनीवरून आणि प्रत्यक्ष भेटून काही उमेदवारांनी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने अशा तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. सध्या सुरूअसलेल्या चालक तथा वाहक पदाच्या भरती प्रक्रियेत नियमानुसार कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक पात्रतेची चाचणी पूर्ण करण्यात येत असून कोणताही वशिला अथवा अवैध हस्तक्षेपाने उमेदवाराला भरती केले जाणार नाही, असे एसटी महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Do not forget temptations during the recruitment process, ST corporation appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.