शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

अवास्तव स्वप्न पाहताना वास्तवात गोंधळ घालू नका : नागराज मंजुळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 13:00 IST

आजकाल गावागावांमधून ‘ऑडिशन्स’ होतात. प्रत्येकालाच आपण अभिनेता-अभिनेत्री व्हावं असं वाटतं...

ठळक मुद्देमराठी रंगभूमीदिनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे पुरस्कार प्रदान 

पुणे : आजकाल गावागावांमधून ‘ऑडिशन्स’ होतात. प्रत्येकालाच आपण अभिनेता-अभिनेत्री व्हावं असं वाटतं. सध्या काय तर, सोशल मीडियावरही ‘टिकटॉक’चे  फॅड निघाले आहे, अशी मिश्कील टिप्पणी करीत आपल्यामध्ये नक्की अभिनयाचे गुण आहेत की नाही, याची सर्वप्रथम पडताळणी करा. उगाच अवास्तव स्वप्नं पाहून वास्तवात गोंधळ घालू नका, असा सल्ला प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी नवोदितांना दिला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या वतीने मराठी रंगभूमीदिनी ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांना प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते कै. जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यावेळी ते बोलत होते.याशिवाय कलावती भडाळे यांना ‘माता जानकी पुरस्कार’, आशा तारे यांना ‘प्रपंच लक्ष्मी पुरस्कार’, प्रकाश पारखी आणि रवींद्र कुलकर्णी यांना ‘कै. चित्तरंजन कोल्हटकर पुरस्कार’ तर वर्षा आणि पराग चौधरी यांना ‘लक्ष्मीनारायण दाम्पत्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, ज्योती चांदेकर, रजनी भट, उपाध्यक्ष शेखर लोहकरे, विजय पटवर्धन, प्रमुख कार्यवाह विनोद खेडकर आणि कोषाध्यक्ष अशोक जाधव उपस्थित होते.प्रास्ताविकात मेघराज राजेभोसले यांनी ‘सैराट’ नंतर प्रत्येकाला अभिनेता व्हावं असं वाटायला लागलं आहे. अनेक बोगस दिग्दर्शक तयार झाले. त्यामुळे ऑडिशन्सच्या नावाने फसवणुकीचे प्रकार वाढले. अखेर चित्रपट महामंडळाची परवानगी घेतल्याशिवाय ऑडिशन्स करता घेता येणार नाही, असे परिपत्रक जाहीर करावे लागल्याचे सांगितले. तोच धागा पकडत नागराज मंजुळे यांनीदेखील प्रत्येकालाच आता अभिनेता-अभिनेत्री व्हावं असं वाटू लागलं आहे. मात्र, आपल्याला नक्की अभिनय येतो का? याची चाचपणी जाणकारांकडून करून घ्या, असे स्पष्ट केले. माझा नाटकाशी संबंध आला तो केवळ शाळेपुरताच. शाळेत शिक्षकच नाटक बसवायचे आणि तेच तरुणांच्या भूमिका करायचे. मग मीच आपल्या भूमिका आपण करायला हव्यात, असे म्हणून सह्यांची मोहीम राबविली. मग आम्हाला  पडद्यामागून संवाद सांगण्याचे काम मिळाले, अशी आठवण नागराज मंजुळे यांनी सांगितली. नाटके खूप कमी बघितली जो काही संबंध आला तो वाचनातून, अशी कबुलीही त्यांनी दिली. पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘रंगला लोकरंग’ हा कार्यक्रम सुंदरपणे गुंफण्यात आला होता. लावणी, गवळण, बतावणी याचा आस्वाद रसिकांनी घेतला. मोनिका जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.............सत्काराला उत्तर देताना आज रंगभूमीदिनी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे  हा पुरस्कार दिला याचा आनंद आणि समाधान वाटत असल्याची भावना भारती गोसावी यांनी व्यक्त केली. चित्रपटात काम न केल्याच दु:ख वाटतं. कारण चित्रपटातून झटपट प्रसिद्धी मिळते. इतकी वर्षे रंगभूमीवर काम करूनही तुम्ही काय करता? असं विचारलं जातं ते ऐकून चित्रपटात का काम केलं नाही, याचा पश्चाताप होतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेNagraj Manjuleनागराज मंजुळेcinemaसिनेमाbollywoodबॉलिवूड