शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही आत्महत्या करू नका.!

By admin | Updated: June 21, 2014 23:35 IST

दरवर्षी पाचविला पुजलेला दुष्काळ.. अवकाळी गारपीट यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

पुणो : दरवर्षी पाचविला पुजलेला दुष्काळ.. अवकाळी गारपीट यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र, त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण कुटूंबच उद्ध्वस्त होत असल्याने या आत्महत्या रोखण्यासाठी पालखी सोहळ्याचे औचित्य साधून या आत्महत्याग्रस्त शेतक:यांची मुले या आत्महत्या रोखण्यासाठी सरसावली आहेत. 
‘आमच्या वडीलांनी आत्महत्या केली.. तशी तुम्ही करू नका’ असा संदेश देत राज्यभरातून आलेले हे चिमुकले आळंदी ते पंढरपूर या मार्गावर शेतक:यांना आवाहन करीत आहेत.  5 वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील अधारतीर्थ आधाराश्रम या संस्थेच्या मध्यमातून ही मुले या दिंडीत सहभागी झाली आहेत. 
राज्यभरातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण गेल्या काही वर्षात मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे अनेक मुले अनाथ होत असून त्यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी आधारतीर्थ या संस्थेने स्वीकारली आहे. या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी ही मुले संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणा:या दिंडीतून आळंदी ते पंढरपूर्पयत समाजप्रबोधनाची जबाबदारी पार पाडत आहेत. 
 संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर शहरात दाखल झालेली अभिनव दिंडी पुणोकरांसाठी उत्सूकतेचा विषय ठरत होती. ठिकठिकाणी या दिंडीचे स्वागत करून या मुलांसाठी पुणोकर मदतीचा हातही पुढे करीत होते. तसेच भावूक होऊन त्यांचे कौतुकही करीत होते. 
 
मायबाप सरकारला जाग येऊ दे
पथनाटय़, डोक्यावर संदेश लिहलेली टोपी, हाती टाळ आणि मृदृंग घेऊन विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करीत कीर्तनातूनही ही मुले आत्महत्या रोखण्याचा संदेश देत आहे. ‘बळीराजाचे राज्य येऊ दे, मायबाप सरकारला जाग येऊ दे’, ‘विठ्ठला शेतक:याच्या आत्महत्या थांबाव’ असा संदेश हे बालवारकरी देत  आहेत.