शेतक-यांना दिवाळी भेट! कर्जमाफीची रक्कम उद्या खात्यात , मुख्यमंत्र्यांची घोषणा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 04:35 IST2017-10-17T04:33:39+5:302017-10-17T04:35:44+5:30

शेतक-यांची दिवाळी गोड व्हावी, म्हणून पहिल्या टप्प्यात दहा लाख शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम १८ आॅक्टोबर रोजी जमा होणार आहे.

 Diwali visit to farmers! In the account of the debt waiver tomorrow, the Chief Minister's announcement | शेतक-यांना दिवाळी भेट! कर्जमाफीची रक्कम उद्या खात्यात , मुख्यमंत्र्यांची घोषणा  

शेतक-यांना दिवाळी भेट! कर्जमाफीची रक्कम उद्या खात्यात , मुख्यमंत्र्यांची घोषणा  

जालना/सोलापूर : शेतक-यांची दिवाळी गोड व्हावी, म्हणून पहिल्या टप्प्यात दहा लाख शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम १८ आॅक्टोबर रोजी जमा होणार आहे. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने महिनाभरात सर्वच पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जालना येथे सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा फायदा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार, थकबाकीदार व नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनी कर्जमाफी योजनेचा फायदा घेण्यासाठी आॅनलाइन भरलेल्या अर्जाचे लेखापरीक्षण करून, ते बँकांनी शासनाच्या पोर्टलवर अपलोड
केले आहे. पोर्टलवर अपलोड केलेल्या माहितीच्या आधारे शासनाच्या आय. टी. विभागाने तपासणी करून त्याची वर्गवारी केली आहे. ग्रीन, यलो, रेड व व्हाइट अशा वर्गवारी केलेल्या शेतकºयांच्या याद्यांपैकी ‘ग्रीन’ यादी कर्जमाफीस पात्र राहाणार आहे. या याद्या जिल्हास्तरावर बँका व तालुकास्तरीय समितीला मंगळवारी मिळणार असून, याच आधारे सन्मानासाठी शेतकºयांची नावे निश्चित केली जाणार आहेत.

शेतक-यांचा सत्कार

बुधवारी मुंबईत राज्यभरातील निवडक शेतक-यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. कर्ज माफ झाल्याचे मुख्यमंत्र्यांच्या सहीचे प्रमाणपत्र, साडी-चोळी देऊन सपत्नीक सत्कार केला जाणार आहे. ग्रीन, यलो, रेड व व्हाइट अशी वर्गवारी केलेल्या शेतक-यांच्या याद्यांपैकी ‘ग्रीन’ यादी कर्जमाफीस पात्र.

Web Title:  Diwali visit to farmers! In the account of the debt waiver tomorrow, the Chief Minister's announcement