शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

निधी वाटपावरून नियामक मंडळाच्या १५ सदस्यांचे नाराजी नाट्य;  विश्वस्त शरद पवारांनाच केला मेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 17:25 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने संकलित केलेल्या 1 कोटी 20 लाख रुपयांच्या निधी वाटपावरून हे नाराजी नाटय चांगलेच रंगले आहे.

पुणे : एकीकडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षांना विधानपरिषदेचे सदस्यत्व देण्याची मागणी परिषदेच्या पदाधिका?यांनी राष्ट्रवादी पक्षाकडे केलेली असताना दुसरीकडे परिषदेच्या नियामक मंडळाच्या राज्य आणि बाहेरील शाखा सदस्यांनीच अध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. नियामक मंडळाच्या सदस्यांना विश्वासात न घेता अडीच वर्षे अध्यक्षांचा हा एककल्ली कारभार सुरू असल्याचा आरोप करीत परिषदेचे विश्वस्त आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच या नाराजी नाट्यचं इमेल करून सदस्यांनी मौन सोडले आहे.       

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने संकलित केलेल्या 1 कोटी 20 लाख रुपयांच्या निधी वाटपावरून हे नाराजी नाटय चांगलेच रंगले आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मनोरंजनसृष्टीही त्याला अपवाद  ठरलेली नाही. या निधीमधून गरजू रंगकमीर्ना मदत करण्याची घोषणा केली जाईल असे परिषदेने जाहीर केले. त्यानुसार सुरुवातीला मुंबई मधील गरजू रंगकर्मी, निमार्ता व पडद्यामागच्या कलाकारांना मदत केली जाईल असे सांगण्यात आले परंतु नियामक मंडळाच्या काही सदस्यांनी आवाज उठविल्यावर महाराष्ट्र व बाहेरील राज्यातील मजीर्तील  सदस्यांकडून नावे मागविण्यात आली. परंतु प्रत्यक्षात किती रंगकमीर्ना मदत केली याची यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही.  हे वाटप नियामक मंडळातील सदस्यांना डावलून झाल्यानं या मंडळातल्या ६० पैकी १५ लोकांनी नाराजी नोंदवली आहे. त्यासंदर्भातला एक लेखी इमेल या मंडळींनी तयार करून तो परिषदेचे विश्वस्त शरद पवार, शशी प्रभू  यांना पाठवला आहे.  या सदस्यांमध्ये सुशांत शेलार, भाऊसाहेब भोईर, मुकुंद पटवर्धन, योगेश सोमण, वीणा लोकूर, दिलीप गुजर, सविता मालपेकर, सुनील महाजन, दिलीप कोरके, जे.पी कुलकर्णी, संदीप पाटील आदी सदस्यांचा समावेश आहे. इमेलमध्ये नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि त्यांच्या कार्यकारिणीने राबवलेल्या पद्धतीवर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत........महाराष्ट्रातील गरजू रंगकर्मी वंचितच     संबंधित गरजूंच्या अकाऊंटवर पैसै जमा केल्याचं सांगितले जात आहे.  परंतु ही मंडळी नक्की कोण आहेत. कुणाला पैसे दिले याची कोणतीही कल्पना नियामक मंडळातल्या सदस्यांना देण्यात आली नाही. आजही महाराष्ट्रातील गरजू रंगकर्मी मदतीपासून वंचितच असल्याकडे एका सदस्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.........गेल्या अडीच वर्षात नियामक मंडळाच्या सदस्यांना विश्वासात घेऊन कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सदस्यांना ना काही  सांगितलं जातं ना त्यांना विचारात घेतलं जातं. आम्ही तुमच्याबरोबर आहोत विरोधात नाही हे अनेकदा अध्यक्षांना सांगितले आहे. आम्ही आत्तापर्यंत गप्प बसलो की आपल्या घरातलेच वाभाडे कशाला काढायचे. पण कधीतरी या मनमानी कारभाराविरुद्ध बोलले गेले पाहिजे म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावे लागले-

- वीणा लोकूर, सदस्य नियामक मंडळ अ.भा.मराठी नाट्य परिषद.....सदस्यांना अजूनही मुलुंडच्या नाट्य संमेलनाचा हिशोब दिलेला नाहीमुलुंड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा हिशोब देखील नियामक मंडळाच्या सदस्यांना देण्यात आलेला नाही.याबाबत विचारणा केली असता कोषाध्यक्ष यांच्याकडून किती खर्च झाला आहे हे पाहायचे असेल तर हा जुजबी हिशोब पाहोा असे  सांगितले जाते याकडे वीणा लोकूर यांनी लक्ष वेधले..........

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकSharad Pawarशरद पवारMarathi Natya Sammelanमराठी नाट्य संमेलन