शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती प्रतिसाद दल स्थापन

By admin | Updated: July 31, 2014 04:31 IST

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) धर्तीवर महाराष्ट्राकरिता स्वतंत्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्यांची स्थापना करण्याचा निर्णय

मुंबई : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) धर्तीवर महाराष्ट्राकरिता स्वतंत्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्यांची स्थापना करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आपत्तीच्या वेळी या तुकड्या तातडीने मदतीसाठी पोहोचतील. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्यांसाठी ४२८ पदे निर्माण करण्यात येणार असून, हे काम मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती करेल. राज्यात सातत्याने पूर, भूकंप, चक्रीवादळ तसेच पाणीटंचाई अशा नैसर्गिक आपत्ती येतात. प्रत्येक वर्षी राज्यातील १५ ते २० जिल्ह्यांना पूर, अतिवृष्टीचा तडाखा बसत असतो. विदर्भातील काही जिल्हे आणी मराठवाड्याचा काही भाग, त्याचप्रमाणे कोयना, रायगड, सातारा, ठाणे हा भाग दुष्काळप्रवण आणि भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतो. लातूरमध्ये झालेल्या भूकंपामुळे अपरिमित हानी झाली होती. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी विदर्भातील जिल्ह्यामध्ये पुराचा तडाखा बसला़ त्या वेळी नागरिकांना हलविण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची मदत घेण्यात आली होती. सध्या ही तुकडी पुणे, तळेगाव दाभाडे येथे असल्याने त्यांना आपत्तीस्थळी पोहचायला खूप वेळ लागतो. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन दोन स्वतंत्र तुकड्या निर्माण करण्यात येतील. प्रत्येक कंपनीत एकूण तीन टीम्स असून, प्रत्येक टीममध्ये ४५ अधिकारी व कर्मचारी असतील. (विशेष प्रतिनिधी)