शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांचे निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहखाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 07:12 IST

वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती मानले जातात. सुरुवातीच्या काळात पवार यांचे साहाय्यक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

मुंबई : अनिल देशमुख यांच्या जागी दिलीप वळसे पाटील हे राज्याचे नवे गृहमंत्री असतील. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेले वळसे पाटील यांच्याकडे आतापर्यंत उत्पादन शुल्क आणि कामगार अशी दोन खाती होती. आता उत्पादन शुल्क खात्याचा अतिरिक्त कार्यभार हा उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कामगार खात्याचा अतिरिक्त कार्यभार हा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सायंकाळी पाठविला असून तो स्वीकारावा, अशी विनंती त्यांना केली होती. याच पत्रात त्यांनी, वळसे पाटील यांच्याकडील सध्याची खाती अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्याची विनंती केली होती. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली.वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती मानले जातात. सुरुवातीच्या काळात पवार यांचे साहाय्यक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे वडील दत्तात्रय वळसे पाटील हेदेखील आमदार होते. गृहमंत्रिपदासाठी शरद पवार कोणाला संधी देतात, याविषयी दिवसभर जोरदार चर्चा होती. जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव आघाडीवर होते. यापूर्वी त्यांनी गृहमंत्रिपद सांभाळलेदेखील आहे. त्याशिवाय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेही नाव चर्चेत होते. मात्र, पवार यांनी वळसे पाटील यांच्या नावाला पसंती दिली. अजित पवार यांनीही वळसे पाटील यांच्या बाजूने कौल दिला, असे सूत्रांनी सांगितले.वळसे पाटील यांचा प्रवासदिलीप वळसे पाटील हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघाचे सातव्यांदा आमदार आहेत. त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, ऊर्जामंत्रिपद तसेच विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळले आहे. अत्यंत अभ्यासू आणि नम्र लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलAnil Deshmukhअनिल देशमुखAjit Pawarअजित पवारHasan Mushrifहसन मुश्रीफJayant Patilजयंत पाटील