शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शेतकऱ्यांना ओटीपीनंतरच मिळणार डिजिटल सातबारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 6:12 PM

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील तब्बल ५१ लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या ७/१२ आणि ८ अ डिजिटल उतारांचे काम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देमोबाईलवरून उतारे काढून देण्याचा व्यवसाय सुरू करू नये, या उद्देशाने एका मोबाईलवर ३ उतारे सध्या संकेतस्थळावर मोफत उतारे मिळत असले तरी लवकरच उताऱ्यांसाठी शुल्क आकारणी सुरू

पुणे : राज्य शासनाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना संगणकावर डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु, सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत महाभूलेखच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मोबाईलवरून ओटीपी क्रमांक प्राप्त करून घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करून घेता येतील, असा बदल शासनाने केला आहे.शासनाच्या ई-फेरफार या महत्वकांक्षी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा उतारे दिले जात आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील तब्बल ५१ लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या ७/१२ आणि ८ अ डिजिटल उतारांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच २ लाख ४० हजाराहून अधिक उतारे डाऊनलोड केले आहेत. दिवसेंदिवस महाभूलेखच्या  https://ZÔhbÔhu’e‘h.ZÔhÔrÔshtrÔ.gov. या संकेतस्थळावर भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे शासनाने डिजिटल सातबारा उतारे केवळ मोबाईलवर ओटीपी प्राप्त करून घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही एका मोबाईल क्रमांकावरून एका दिवसाला केवळ ३ सातबारा उतारे प्राप्त करून घेता येईल, अशीही अट घालण्यात आली आहे.मोबाईलवरून उतारे काढून देण्याचा कोणी व्यवसाय सुरू करू नये, या उद्देशाने एका मोबाईलवर केवळ ३ उतारे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय कामासाठी ७/१२ आणि ८ अ चे उत्तारे आवश्यक असलेल्यास तलाठी कार्यालयात १५ रुपये शुल्क भरून उतारे प्रप्त करता येतात. तसेच संकेतस्थळावरून मोफत उतारे मिळवता येतात. सध्या संकेतस्थळावर मोफत उतारे मिळत असले तरी लवकरच उताऱ्यांसाठी शुल्क आकारणी सुरू केली जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीGovernmentसरकारdigitalडिजिटल