शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

भावना गवळींच्या अडचणी वाढल्या; ईडीकडून बांधकाम विभागाचीही चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 5:03 PM

Bhavana Gawali : वाशिम जिल्ह्यातील बांधकाम विभाग व देगाव येथील कार्यालयात ईडीच्या पथकाने चौकशी सुरू केल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली

वाशिम : शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणीतत दिवसेंदिवस वाढ होत असताना १२ आॅक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्यातील बांधकाम विभाग व देगाव येथील कार्यालयात ईडीच्या पथकाने चौकशी सुरू केल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली. ईडीच्या या पथकात ५० अधिकाºयांचा समावेश असल्याची माहिती हाती आली आहे.खासदार भावना गवळी यांना ईडी कार्यालयात ४ आॅक्टोबर रोजी हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले होते. परंतु खासदार गवळी यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी १५ दिवसाचा अवधी मागितला होता. त्यांची विनंती मान्य करून ईडीने वाशिम शहरात सुरू असलेल्या रस्ता बांधकामात गैरप्रकार झाल्याच्या हरिष सारडा यांच्या तक्रारीहुन औरंगाबाद येथील अजयदिप इन्फ्राकॉन प्रायवेट लिमिटेडचे संचालक यांची ईडी कार्यालयात तब्बल ११ तास कसुन चौकशी करण्यात आली.  या चौकशीत वाशिम शहरातील रस्त्याच्या कामासाठी एकुण ५ निविदा आल्या, यातील दोन निविदा या बेकायदेशीररित्या अपात्र करण्यात आल्या, उवरित तीन निविदा अजयदिप इन्फ्राकॉन प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या होत्या. या कंपनीने १३ टक्के जास्त दराने हे काम घेतले. या संदर्भात वाशिम येथील हरिष सारडा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. महत्वाची बाब म्हणजे या संदर्भात ईडी समोर सुरू असलेल्या चौकशीत अजयदीप इन्फ्राकॉन या कंपनीने सईद खान यांच्या भूमी कन्स्ट्रक्शन कंपनीला अवैधरित्या निविदा दिल्याचे उघडकीस आले. आणी ही प्रक्रिया पुर्णत: अवैध असल्याचा दावा सारडा यांनी केला होता. या अनुषंगाने ईडी कार्यालयाचे तब्बल ५० अधिकारी व कर्मचारी यांचा ताफा वाशिम शहरात १२ आॅक्टोबरला दाखल झाला. या पथकातील अधिकाºयांनी आज बांधकाम विभाग, धर्मदाय आयुक्त कार्यालय, देगाव येथील पार्टीकल बोर्ड, पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय वाशिम व मंगरूळपीर पोलीस स्टेशनला भेटी दिल्याचीही चर्चा आहे.

 बांधकाम विभागातील चौकशीचे प्रमुख मुद्देबांधकाम विभागाने ५५ कोटी किंमतीची निविदा काढली होती. या प्रक्रियेत मुख्य अभियंता प्रशांत नवघरे व अधिक्षक अभियंता गिरीश जोशी यांची भुमिका काय आहे. ५५ कोटी किंमतीची निविदा अजयदीप इन्फ्राकॉन या कंपनीला मिळाली होती.  निविदा काढतेवेळी ही निविदा सबलेट (दुसºयाला हस्तांतरीत करता येत नाही) करण्याची कोणतीही तरतुद नव्हती. असे असतानाही ही निविदा सईद खान यांच्या भुमी कन्स्ट्रक्शन कंपनीला सबलेट कशी केली व कोणाच्या दबावाखाली केली. या मुद्यावर कसुन चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयwashimवाशिम