शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

डिझेल दरवाढीचा एसटीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:52 IST

आर्थिक झळ : लॉकडाऊनमुळे फेऱ्यांवर परिणाम

मुंबई : लॉकडाऊनमुळे एसटीचे चाक बंद आहे. परिणामी, एसटीचे प्रवासी उत्पन्न बंद झाले आहे. यात डिझेलची दरवाढ झाल्याने एसटीला आणखीन आर्थिक झळ बसताना दिसून येत आहे. १ जूनपासून डिझेलचे ६४.४८ रुपये दर झाल्याने एसटीचे चाक तोट्याच्या खड्ड्यात आणखी रुतले जाणार आहे. लॉकडाऊन काळात दरदिवशी पेट्रोल, डिझेल दरवाढ होत आहे.एसटी महामंडळाने २१ मे रोजी ५५.१८ रुपयांमध्ये डिझेल विकत घेतले होते. मात्र १ जूनपासून ६४.४८ रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे १० दिवसांत एसटीला जादा ९.१३ रुपये मोजावे लागत आहेत. एसटी महामंडळाच्या नियमित सेवेसाठी दररोज १२ लाख लीटर डिझेल लागले. त्यातून महामंडळाला दैनंदिन २२ कोटींचे उत्पन्नसुद्धा मिळते.मात्र, सध्या एसटीची प्रवासी सुविधा संपूर्ण बंद आहे. फक्त मुंबई उपनगरांमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू असून, राज्यामध्ये आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू आहे. यात फिजिकल डिस्टन्सिंंगच्या नियमांचे पालन करताना २२ प्रवासी अत्यावश्यक सेवेत बसतात. मात्र, राज्यातील इतर विभागात एक फेरीत सरासरी ७ ते ८ प्रवाशांचा प्रवास होत आहे. परिणामी, एसटी महामंडळाला डिझेलच्या खर्चाचा भार सोसावा लागत आहे.एसटी खर्च कसा भागविणार विविध सवलत मूल्यांच्यÞा प्रतीपूर्तीसाठी राज्य सरकारकडे शिल्लक असलेली रक्कम एसटीला देण्यात येत होती. आता मात्र फक्त २७ कोटी रक्कम राज्य सरकारकडे शिल्लक आहे. प्रवासी उत्पन्न बंद असल्याने आता कर्मचाऱ्यांचे वेतन, इंधन खर्च आणि इतर खर्च करताना एसटीला अडचणी येणार आहेत.कोरोनाच्या काळात एसटी डबघाईला आली आहे. यात डिझेलचे दर वाढल्याने एसटीला आणखी आर्थिक फटका बसणार आहे. एसटीचा डिझेलवर एसटीला एकूण वर्षाला २ हजार ८०० कोटी रुपये खर्च येतो. मात्र केंद्र आणि राज्य सरकारचा मूल्यवर्धितकर माफ केला पाहिजे. यामुळे एसटीची वर्षाला १ हजार २०० कोटी रुपयांची बचत होईल, अशी प्रतिक्रिया एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिली.

टॅग्स :state transportएसटी