ओवेसींनी लोकसभा निवडणुकीतच घेतला होता, पडळकरांच्या हालचालींचा वेध ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 05:59 PM2019-09-26T17:59:30+5:302019-09-26T17:59:54+5:30

प्रकाश आंबेडकरांसोबत आरएसएसचे लोक असल्याचा आरोप करत जागा वाटपाच्या मुद्दावर एमआयएमने वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता पडळकरही भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आंबेडकरांना एमआयएमवर अविश्वास आणि पडळकरांवरचा अतिविश्वास नडला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Did Owaisi observing Padalakar's from Lok Sabha poll | ओवेसींनी लोकसभा निवडणुकीतच घेतला होता, पडळकरांच्या हालचालींचा वेध ?

ओवेसींनी लोकसभा निवडणुकीतच घेतला होता, पडळकरांच्या हालचालींचा वेध ?

Next

- रवींद्र देशमुख

मुंबई - दलित, मुस्लीम आणि धनगर समाजाचा एकोपा करून लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या वंचित बहुजन आघाडीने लक्षवेधी मते मिळवली होती. वंचितमुळे आघाडीचे अनेक उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे वंचित विधानसभेला महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढेल अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु, एमआयएम आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर सोडून गेल्याने वंचित आघाडीला जबर धक्का बसला आहे.

गोपींचद पडळकरांवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना मोठा विश्वास होतो. तर एमआयएमला पडळकरांचे वावडे होते. याचे इशारेही एमआयएमने दिले होते. खुद्द जलील यांनी आंबेडकरांसोबत आरएसएसमधील लोक असल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या पडळकरांकडे बोट दाखवले. त्यानंतर वंचितला गळती लागली आहे.

वंचितसोबत एमआयएमने लोकसभा निवडणूक लढवली होती. राज्यात वंचितने 48 जागा लढवल्या होत्या. त्यात केवळ औरंगाबादमध्ये वंचितचा उमेदवार विजयी झाला. त्यावेळी असुद्दीन ओवेसी यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या. मात्र पडळकरांच्या प्रचाराला जाण्याचे टाळले होते. त्यामुळे पडळकर पुन्हा भाजपमध्ये परत जाणार याची कुणकुण एमआयएमला लागली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान लोकसभेला दोन जागांवर पराभव झाल्यामुळे विधानसभेला आंबेडकरांना मुस्लीम मतांवर विश्वास राहिला नाही. तर पडळकरांवर आंबेडकरांचा अति विश्वास होता. आंबेडकरांसोबत आरएसएसचे लोक असल्याचा आरोप करत जागा वाटपाच्या मुद्दावर एमआयएमने वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता पडळकरही भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आंबेडकरांना एमआयएमवर अविश्वास आणि पडळकरांवरचा अतिविश्वास नडला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Did Owaisi observing Padalakar's from Lok Sabha poll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.