शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेहींनाही आता खाता येईल भात!

By admin | Updated: July 19, 2015 01:56 IST

मधुमेह म्हटले की डॉक्टर सर्वप्रथम भात बंद करायला सांगतात. पण आता मधुमेहींनाही खाता येईल अशा भाताचे नवे वाण विकसित करून येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण

- शिवाजी गोरे, दापोलीमधुमेह म्हटले की डॉक्टर सर्वप्रथम भात बंद करायला सांगतात. पण आता मधुमेहींनाही खाता येईल अशा भाताचे नवे वाण विकसित करून येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने त्यांना खूशखबर दिली आहे.तांदळाचे लाल रंगाचे बारीक व बुटके दाणे असलेल्या या भाताच्या नव्या जातीत शर्करेचे प्रमाण कमी आणि लोह अधिक असल्याने हा भात सर्वसामान्यांबरोबरच मधुमेहींच्या तोंडाची चवही वाढवणारा ठरेल. शिवाय सध्या जेथे भात पिकविले जाते त्याच क्षेत्रात सुमारे दीडपट अधिक उत्पादन देणारे असल्याने हे नवे वाण सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही वरदान ठरणार आहे.कोकणातील शेतकऱ्याला भातशेती परवडत नसल्याने कोकण कृषी विद्यापीठाच्या अथक प्रयत्नाने अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करण्याचे प्रयत्न शास्त्रज्ञ करीत आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आता कृषी विद्यापीठाने दीडपट उत्पादन देणारे लाल भात हे नवे वाण विकसित केले आहे.विद्यापीठाने यापूर्वी विकसित केलेल्या रत्नागिरी, कर्जत इत्यादी भाताच्या जाती शेकऱ्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत. पारंपरिक बियाण्यांमधून हेक्टरी २० क्विंटल इतके भाताचे उत्पादन मिळत होते. गेल्या काही वर्षांत संशोधित केलेल्या विविध जातींमुळे ते हेक्टरी ४५ क्विंटलपर्यंत वाढले. आता येथील शास्त्रज्ञांनी लाल भात बियाणे विकसित केले आहे. या बियाण्यापासून हेक्टरी सुमारे ६० क्विंटल उत्पादन शेतकऱ्याला मिळणार आहे. कमी खर्चात वाढत्या उत्पादकतेमुळे शेतकरी पुन्हा भात शेतीकडे वळतील, असा विश्वास शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत.

लाल भाताच्या नव्या जातीत कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे. तसेच लाल भातातून लोहही जास्त प्रमाणात मिळेल. या भाताचा फायदा मधुमेहींना होणार आहे.

वैशिष्ट्ये...- हेक्टरी ६0 क्विंटल उत्पादन- आरोग्यास उपयुक्त- कमी शर्करा. जास्त कॅल्शियम आणि लोहविद्यापीठाने विकसित केलेली ही जात शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहेच. शिवाय, हा तांदूळ आरोग्यदायीही असेल. यातून मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम व लोह मिळेल; तसेच शर्करेचे प्रमाण कमी असल्याने मधुमेहींनाही ती उपयुक्त ठरेल.- डॉ. संजय भावे,विस्तार शिक्षण संचालक, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली