‘एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी धुळे, नंदुरबार पॅटर्न’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 09:17 IST2025-06-08T09:16:42+5:302025-06-08T09:17:18+5:30

ST Bus News: राज्यात पहिल्या आलेल्या धुळे-नंदुरबार विभागाचा पॅटर्न सगळीकडे वापरणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. 

‘Dhule, Nandurbar pattern to increase ST income’ | ‘एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी धुळे, नंदुरबार पॅटर्न’

‘एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी धुळे, नंदुरबार पॅटर्न’

धुळे - एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे व उत्पन्नवाढीस चालना देणे, या हेतूने उत्पन्न वाढीबरोबर विविध अनावश्यक खर्चात कपात करण्याच्या उपाययोजना राबविणे आवश्यक असून, राज्यात पहिल्या आलेल्या धुळे-नंदुरबार विभागाचा पॅटर्न सगळीकडे वापरणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. 
 मुंबईत उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हे सुतोवाच केले.
      यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आपत्कालीन भत्ता वापरावर नियंत्रण ठेवणे. कर्मचाऱ्यांना रजा देताना गर्दीच्या हंगामामध्ये जास्तीत जास्त कर्मचारी उपलब्ध होतील याची दक्षता बाळगणे. आठवडा बाजार, यात्रा, जत्रा अशावेळी प्रवासी गर्दीनुसार जास्तीत जास्त बस फेऱ्या उपलब्ध करून देणे. अशा उपाययोजना करण्यावर भर दिला पाहिजे, अशा सूचना बैठकीत केले. त्यालाही सरनाईक यांनी संमती दिली. 

Web Title: ‘Dhule, Nandurbar pattern to increase ST income’