Breaking: धुळे-नंदुरबार विधानपरिषद पोटनिवडणूक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 19:24 IST2020-03-04T19:23:32+5:302020-03-04T19:24:39+5:30
अमरीशभाई पटेल यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

Breaking: धुळे-नंदुरबार विधानपरिषद पोटनिवडणूक जाहीर
मुंबई : अमरीशभाई रसिकलाल पटेल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या धुळे नंदुरबार स्थानिक संस्था या विधानपरिषदेच्या जागेवर याच महिन्यात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे.
येत्या 30 मार्चला मतदान होणार आहे. अमरीशभाई पटेल यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विधानपरिषद अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यावेळी त्यांचे भाऊ आणि उपनगराध्यक्ष भूपेश पटेल हे देखील उपस्थित होते.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.
Election Commission of India: The Commission has decided to hold a bye-election to the Maharashtra Legislative Council from Dhule-cum-Nandurbar Local Authorities' constituency that is vacant since the resignation of Amrishbhai Rasiklal Patel. Polling will be held on 30th March.
— ANI (@ANI) March 4, 2020