धनंजय मुंडे यांचीही जीभ घसरली; म्हणाले, मोदीला उरावर घेतलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 12:59 IST2019-04-03T12:59:30+5:302019-04-03T12:59:47+5:30
धनंजय मुंडे म्हणाले, पाच वर्षांपूर्वी एखादा मोटारसायकलवाला पन्नास रुपये लिटर भावाप्रमाणे पेट्रोल भरत होता. आणि आज तोच भाव ८१ रुपये जर असेल तर मोदी साहेबांनी मोटारसायकलवाल्यांची दिवसाढवळ्या रोज ३१ रुपयांची लूट केली आहे. पावणेचारशे रुपयांचे सिलेंडर एक हजार रुपयांपर्यंत गेलं.

धनंजय मुंडे यांचीही जीभ घसरली; म्हणाले, मोदीला उरावर घेतलं
अहमदनगर : पावणेचारशे रुपयाचं सिलेंडर एक हजार रुपयांपर्यत गेलं. साठ रुपयांची दाळ १२० रुपयांवर गेली. महागाई थांबविण्याचं स्वप्न मोदीनं दाखवलं. त्याच मोदींनी प्रत्येकी किती लूट केली याचा विचार करा. तुम्हाला कळूनसुध्दा दिलं नाही. सिलेंडरच्या माध्यमातून दिवसाला सहाशे रुपयांची लूट तुमच्या घरातून केली. 'सपनो के सौंदागर ने सपना दिखाया. आपण स्वप्नात रंगून गेलो. महागाई नसताना महागाई समजली आणि मोदीला उरावर घेतलं, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं. अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ मंगळवारी(२ एप्रिल) रोजी मुंडे बोलत होते.
धनंजय मुंडे म्हणाले, पाच वर्षांपूर्वी एखादा मोटारसायकलवाला पन्नास रुपये लिटर भावाप्रमाणे पेट्रोल भरत होता. आणि आज तोच भाव ८१ रुपये जर असेल तर मोदी साहेबांनी मोटारसायकलवाल्यांची दिवसाढवळ्या रोज ३१ रुपयांची लूट केली आहे. पावणेचारशे रुपयांचे सिलेंडर एक हजार रुपयांपर्यंत गेलं. सिलेंडरच्या माध्यमातून दिवसाला सहाशे रुपयांची लूट तुमच्या घरातून केली. तुम्हाला कळूनसुध्दा दिलं नाही. महागाई कधी आहे.
पाच वर्षापुर्वी हीच तरुणाई निवडणुकीच्या काळात जमिनीवरून दीड-दीड फूट उड्या मारून म्हणायची ‘हर हर मोदी...घर घर मोदी’. एका भाषणात मोदीनी तरुणाईलाही स्वप्न दाखवलं. 'मै हर साल दोन करोड रोजगार निर्माण करूंगा'. तरूणाईला वाटलं, भला माणूस देशाचा प्रधानमंत्री होतोय, वर्षाला दोन कोटी नोकऱ्या मिळणार आहेत. दोन कोटीतील एक नोकरी मला मिळणार आहे. आणि नोकरीचा प्रश्न सुटला की छोकरीचा प्रश्न संपणार आहे. छोकरीचा प्रश्न सुटला की घरात हम दो हमारे हमारे दो. माझ्या घरात अच्छे दिन येणार आहेत. तिच तरुणाई पाच वषार्नंतर आता समोर दिसायला लागलीय.
या तरूणाईला मी विचारतोय, आता कसं र..? तर हळूच कानात येऊन सांगतय... भाऊ पाच वर्षांत साधी सोयरीक सुध्दा आली नाही. इमानदारीनं सांगा आपण खेडेगावात राहणारी, शेतकरी आहोत. खर सांगा, सोयरिकी आल्या का ? आल्या तर काय विचारलं ? नोकरी आहे का पाच वर्षांत नोकरी तर मिळाली नाही. सर्वाधिक बेरोजगारी पाच वर्षात माजली. मोदी साहेबांच्या कृपेनं बेरोजगारी निर्माण झाल्याचे मुंडे यांनी म्हटले.