धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 23:53 IST2021-03-23T23:51:48+5:302021-03-23T23:53:24+5:30

जूनमध्ये कोरोनामुक्त झालेल्या धनंजय मुंडेंना पुन्हा कोरोनाची लागण

Dhananjay Munde tested corona positive for the second time | धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते  धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांनी ट्वीट करुन याबद्दलची माहिती दिली आहे. याआधी गेल्या वर्षी जूनमध्ये मुंडे यांची कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात आले. कोरोनावर मात करून ते राजकारणात सक्रियदेखील झाले होते. 

'माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी', असं धनंजय मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
 

Web Title: Dhananjay Munde tested corona positive for the second time