Dhananjay Munde political attack on Devendra Fadnavis | एकेकाळचा 'बबन्या' भाजपमध्ये बबनराव कसा होतो: धनंजय मुंडे
एकेकाळचा 'बबन्या' भाजपमध्ये बबनराव कसा होतो: धनंजय मुंडे

मुंबई - विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा काळ शिल्लक राहिला असताना, सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आत्तापासूनच सत्ताधारी आणि विरोधीपक्षात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रादरम्यान विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. माजी मंत्री आणि भाजपचे नेते बबनराव पाचपुते राष्ट्रवादीत असताना भाजपसाठी 'बबन्या' होते. मात्र भाजपप्रवेश होताच ते बबनराव कसे झाले. असा टोला मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. आज जिंतूर येथे असलेल्या याच यात्रेतून मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आत्ता भाजपमध्ये असलेले बबनराव पाचपुते जेव्हा राष्ट्रवादीत मंत्री होते. त्यावेळी फडणवीस यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचारी असल्याचे आरोप केले. त्यावेळी ते तुमच्यासाठी 'बबन्या' होते. मात्र भाजपमध्ये येताच ते बबनराव झाले. असा खोचक टोला मुंडे यांनी फडणवीस यांना लगावला.

मुख्यमंत्री यांच्या या भूमिकेमुळे, त्यावेळी झालेले आरोप फक्त राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्यासाठी होते. नाहीतर भाजप पक्षात भ्रष्टाचारी आहे हे फडणवीस यांनी मान्य करायले हवेत असेही मुंडे म्हणाले. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ते भाजपमध्ये जाताच पवित्र कसे होतात असा प्रश्न मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला.


Web Title: Dhananjay Munde political attack on Devendra Fadnavis
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.