विधान परिषदेच्या आजी-माजी विरोधीपक्ष नेत्यांची भेट; मुंडेंनी दिल्या दरेकरांना शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 02:56 PM2019-12-17T14:56:24+5:302019-12-17T15:04:57+5:30

दरेकर यांच्या निवडीनंतर त्यांना विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.

Dhananjay Munde greets Darekar | विधान परिषदेच्या आजी-माजी विरोधीपक्ष नेत्यांची भेट; मुंडेंनी दिल्या दरेकरांना शुभेच्छा

विधान परिषदेच्या आजी-माजी विरोधीपक्ष नेत्यांची भेट; मुंडेंनी दिल्या दरेकरांना शुभेच्छा

googlenewsNext

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर, भाजपकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र अखेर मनसेतून भाजपमध्ये आलेले प्रवीण दरेकर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली आहे. तर विधानपरिषदेच्या माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी सुद्धा दरेकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कधीकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून समजले जाणारे दरेकर यांनी मनसेकडून 2014 च्या विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर दरेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना विधानपरिषदेवर पाठवून आमदार केलं. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले दरेकर यांची आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली आहे.

दरेकर यांच्या निवडीनंतर त्यांना विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. “ प्रवीण दरेकर यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड झाली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. त्यांनी विद्यार्थीसेनेपासून सुरवात करत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सहकारातही ठसा उमटवला. निश्चितपणे ते विरोधी पक्षनेते पदाला न्याय देतील, असा मला विश्वास असल्याचे मुंडे म्हणाले.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत होते. सर्वात आधी या शर्यतीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस, सूरजीतसिंह ठाकूर यांची नावंही चर्चेत होती. तसेच विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी मीच अनुभवी असल्याचा दावा विनायक मेटे यांनी केला होता.

 

 

Web Title: Dhananjay Munde greets Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.