शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Dhanajay Munde: 'मुंडें साहेबांच्या वारसांना हे जमलं नाही'; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना अप्रत्यक्ष टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 21:43 IST

Dhanajay Munde: आज पुण्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्धाघटन करण्यात आले.

पुणे: आज पुण्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्धाघटन करण्यात आले. पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसरात हा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लावली. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी नाव न घेता पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना टोला लगावला.

काय म्हणाले धनंजय मुंडे?धनंजय मुंडे यांनी या मेळाव्यात पंकजा मुंडे यांचे नाव न घेता टीका केली. 'गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळ सुरू होत आहे. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी संघर्ष केला. त्यांच्या वारसदारांनाही संधी मिळाली, पण त्यांना हे महामंडळ निर्माण करता आले नाही', असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

'अजित पवारांमुळे आजचा दिवस शक्य'ते पुढे म्हणाले की, 'आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे. हा दिवस अजित पवार यांच्या शिवाय शक्यच नव्हता. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी लढा दिला. त्यांच्या कार्यकालात त्यांना हे महामंडळ देणे शक्य झाले नाही. कदाचित हे महामंडळ माझ्या आणि अजित पवार यांच्या हस्ते व्हावं, ही नियतीची इच्छा असावी. आजचा कार्यक्रम हा मुंडे साहेबांनी ही आदरांजली आहे', असंही धनंजय मुंडे म्हणाले. 

'...काय तोंड घेऊन आम्ही मंत्रिपदी बसलोय'ते पुढे म्हणाले की, आज असंख्य ऊसतोड भगिनींचा प्रश्न आहे. चार दिवस कमी होतात म्हणून आमच्या भगिनींचे गर्भायश काढावे लागत असेल तर काय तोंड घेऊन आम्ही मंत्रिपदी बसलोय. आमच्या भगिनींच्या आरोग्याची काळजीही हे महामंडळ घेईल. भगवान गड असेल किंवा बीड जिल्ह्यातील इतर गड असतील हे कोणत्याही मोठ्या माणसांच्या देणगीवर नाही तर ऊसतोड मजुरांच्या देणगीवर मोठे होतायेत, असंही धनंजय मुंडे म्हणाले. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेPuneपुणेAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात