शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
2
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
3
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
4
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
5
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
6
नारळ पाणी प्यायल्याने खरंच कमी होतं का वजन? डॉक्टरांनीच सांगितलं 'हे' सत्य
7
सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
8
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक
9
Video: दोन सिंहांमध्ये जुंपली... तुफान भांडण, एकमेकांवर हल्ले... पाहा कोण कुणावर भारी?
10
Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून
11
उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी
12
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला सरकारचे सहकार्य: देवेंद्र फडणवीस
13
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या
14
मुकेश अंबानींनी केली नव्या कंपनीची घोषणा...! आता कोणता बिझनेस करणार? जाणून घ्या
15
Maratha Morcha Mumbai: आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले
16
मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेली निकिता पंजाबमध्ये सापडली; पळून जाऊन बॉयफ्रेंडशी केलं लग्न
17
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांना मोठा धक्का; कोर्टाने लीक फोन कॉल प्रकरणात ठरवलं दोषी
18
पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताची नवी खेळी; सौदी अरेबियाला संरक्षण क्षेत्रात दिली मोठी ऑफर
19
'भारताने पाणी सोडले म्हणून मृतदेह वाहत आले...', पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा गरळ ओकली
20
त्याने BMW थांबवली, मला म्हणाला गाडीत बस अन्...; नम्रता संभेरावने सांगितला बॉलिवूड अभिनेत्याचा 'तो' किस्सा

धामापूर तलावाला ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’चा दर्जा; महाराष्ट्राचा जागतिक सन्मान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 07:02 IST

महाराष्ट्रातील पहिलाच तलाव; आंतरराष्ट्रीय सिंचन आणि ड्रेनेज कमिशन (आयसीआयडी) द्वारे जाहीर झाला पुरस्कार

चौके (जि. सिंधुदुर्ग) : धामापूर (ता. मालवण) येथील तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईटने पुरस्कृत केले गेले आहे. आतापर्यंत तेलंगणातील दोन साईट्सना ही जागतिक ओळख मिळाली होती. यंदा आंध्र प्रदेशमधल्या तीन साईट्स आणि महाराष्ट्रातील धामापूर तलावाला प्रथमच हा जागतिक सन्मान मिळाला आहे. 

जगातील  ७४ हेरिटेज इरिगेशन साईटस्मध्ये जपानमधील ३५, पाकिस्तानमधील  १ व श्रीलंका येथील २ साईट्स यांना हा जागतिक सन्मान आतापर्यंत  मिळाला आहे.   दिल्ली येथील सेंट्रल वॉटर कमिशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्यमंतक संस्थेचे संस्थापक सचिन देसाई यांना दूरध्वनी आणि ईमेलद्वारे  तलावाबद्दलच्या या सन्मानाची माहिती दिली.  स्यमंतक संस्थेतर्फे धामापूर तलावाचे तपशीलवार डॉक्युमेंटेशन सेंट्रल वॉटर कमिशनला सादर केले गेले होते. सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे  ७१ व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये धामापूर तलावाला हा सन्मान दिला जाईल.

‘मी धामापूर तलाव बोलत आहे’ ही डॉक्युमेंट्री रिलीज केली जाणार आहे. - सचिन देसाई, स्यमंतक संस्थेचे संस्थापक

पाच एकर परिसरात वसला तलावमालवण तालुक्यातील धामापूर हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. सदैव हिरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी, माड-पोफळीची झाडे आहेत. दुतर्फा डोंगराच्याच मधोमध हा ऐतिहासिक तलाव आहे. या तलावाच्या काठावर श्री भगवतीचे प्राचीन देवालय आहे.पाच एकर क्षेत्रात पसरलेल्या विस्तीर्ण तलावाचा जलाशय अत्यंत नितळ आणि स्वच्छ असून नौकाविहार उपलब्ध आहे.

महाराष्ट्रातील पहिला तलाव

  • २०१८ मध्ये कॅनडा येथे झालेल्या ६९व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये भारताला पहिल्यांदा ‘सदरमट्ट आनीकट्ट’ आणि ‘पेड्डा चेरू’  या तेलंगणा राज्यातील दोन साईट्सना ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’  म्हणून पुरस्कृत केले गेले होते.  
  • २०२० च्या ७१व्या  सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे  होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये जगातील १४ साईट्सना ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’  म्हणून पुरस्कृत केले जाणार आहे. 
  • यापैकी भारतात आंध्र प्रदेशमधील ‘कुंबम तलाव’ (सन १७०६), ‘के. सी. कॅनल’ (सन १८६३) , ‘पोरुममीला टँक’  (सन १८९६) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धामापूर तलाव (सन १५३०) यांना हा मान प्राप्त होणार आहे.  
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग