अनुदानित गॅसवर ढाबेवाल्यांचा डल्ला, राज्यभर तपासणी मोहीम; स्थानिक प्रशासनाकडून विविध ठिकाणांवरून सिलिंडर जप्तीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 10:27 IST2026-03-15T10:26:37+5:302026-03-15T10:27:12+5:30

मुंबई : राज्यात घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर आणि काळाबाजार वाढत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. धाराशिव, पुणे, ...

Dhaba owners' gang on subsidized gas, inspection campaign across the state; Local administration seizes cylinders from various places | अनुदानित गॅसवर ढाबेवाल्यांचा डल्ला, राज्यभर तपासणी मोहीम; स्थानिक प्रशासनाकडून विविध ठिकाणांवरून सिलिंडर जप्तीची कारवाई

अनुदानित गॅसवर ढाबेवाल्यांचा डल्ला, राज्यभर तपासणी मोहीम; स्थानिक प्रशासनाकडून विविध ठिकाणांवरून सिलिंडर जप्तीची कारवाई

मुंबई : राज्यात घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर आणि काळाबाजार वाढत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. धाराशिव, पुणे, श्रीगोंदा आदी भागांत हॉटेल, ढाबे तसेच लहान-मोठ्या उद्योगांमध्ये घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पुरवठा विभागाने संयुक्तपणे धडक मोहीम सुरू केली असून विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून तपासणी केली जात आहे. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर आढळून येत असून संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर  पुण्यातील पिंपळे गुरवमध्ये तब्बल २६१ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

श्रीगोंद्यात २३ हाॅटेलवर छापे, १३ घरगुती सिलिंडर जप्त
श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) : घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट झाले असून शनिवारी श्रीगोंदा शहरातील २३ हाॅटेलवर छापे टाकले. या कारवाईत ६ हाॅटेल्स व एका दूध डेअरीतून एकूण १३ घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. गॅस वितरकांनी नियमानुसार, घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वाटप करावे. तसेच ग्राहकांनी देखील गॅस इतरांना देऊ नये, असे तहसीलदार सचिन डोंगरे यांनी सांगितले.

बेकरी उत्पादनात नाशिकमध्ये ४० टक्क्यांनी घट
नाशिक : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि जादा दराने होणारी विक्री यामुळे शहरातील बेकरी व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या तीन दिवस पुरेल इतके व्यावसायिक सिलिंडर असून, त्यानंतर डिझेलच्या ओव्हनचा वापर करण्यात येईल, असे व्यावसायिकांनी सांगितले.

बेकरी हा पूर्णपणे गॅसवर आधारित व्यवसाय असल्याने उत्पादनासाठी सातत्याने गॅसची गरज भासते. मात्र, सिलिंडरअभावी अनेक व्यावसायिकांनी मर्यादित उत्पादन केले आहे.

मागणी १४०० ची, मिळाले ३०० सिलिंडर
मोवाड नागपूर : येथील इंडेन गॅस एजन्सीसमोर नागरिकांची लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. येथे १४०० नागरिकांनी सिलिंडरसाठी मागणी केली होती. मात्र, त्यापैकी फक्त ३०० सिलिंडर मिळाले. 

बेकरी उत्पादनात नाशिकमध्ये ४० टक्क्यांनी घट
नाशिक : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि जादा दराने होणारी विक्री यामुळे शहरातील बेकरी व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या तीन दिवस पुरेल इतके व्यावसायिक सिलिंडर असून, त्यानंतर डिझेलच्या ओव्हनचा वापर करण्यात येईल, असे व्यावसायिकांनी सांगितले.

बेकरी हा पूर्णपणे गॅसवर 
आधारित व्यवसाय असल्याने उत्पादनासाठी सातत्याने गॅसची गरज भासते. मात्र, सिलिंडरअभावी अनेक व्यावसायिकांनी मर्यादित उत्पादन केले आहे.
मागणी १४०० ची, मिळाले ३०० सिलिंडर

मोवाड नागपूर : येथील इंडेन गॅस एजन्सीसमोर नागरिकांची लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. येथे १४०० नागरिकांनी सिलिंडरसाठी मागणी केली होती. मात्र, त्यापैकी फक्त ३०० सिलिंडर मिळाले. 

Web Title : अनुदानित गैस की चोरी: राज्यव्यापी छापे, अधिकारियों द्वारा सिलेंडर जब्त

Web Summary : राज्यव्यापी छापों में पता चला कि रेस्तरां अवैध रूप से सब्सिडी वाले गैस सिलेंडरों का उपयोग कर रहे हैं। अधिकारियों ने कई स्थानों पर सिलेंडर जब्त किए, जिनमें पिंपले गुरव, पुणे में 261 शामिल हैं। वाणिज्यिक गैस की कमी के कारण नासिक में बेकरियों को उत्पादन में कटौती का सामना करना पड़ रहा है। मोवाड, नागपुर में, अनुरोधित 1400 सिलेंडरों में से केवल 300 की आपूर्ति की गई।

Web Title : Restaurants Stealing Subsidized Gas: Statewide Raids, Cylinders Seized by Authorities

Web Summary : Statewide raids reveal restaurants illegally using subsidized gas cylinders. Authorities seized cylinders in multiple locations, including 261 in Pimple Gurav, Pune. Bakeries in Nashik face production cuts due to commercial gas shortages. In Mowad, Nagpur, only 300 of 1400 cylinders requested were supplied.