DGP'ने डीसीपी दर्जाच्या ९ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना दिली स्थगिती; एक दिवस आधी झाले फेरबदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 18:31 IST2022-11-08T18:20:38+5:302022-11-08T18:31:43+5:30
पोलीस विभागातील बदल्यांमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहेत. डीजीपींनी मंगळवारी गृह विभागाने केलेल्या बदलीच्या आदेशात हस्तक्षेप केला आहे.

DGP'ने डीसीपी दर्जाच्या ९ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना दिली स्थगिती; एक दिवस आधी झाले फेरबदल
पोलीस विभागातील बदल्यांमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहेत. डीजीपींनी मंगळवारी गृह विभागाने केलेल्या बदलीच्या आदेशात हस्तक्षेप केला आहे. पोलीस आस्थापना मंडळ कार्यालयाने नवा आदेश जारी केला असून, यात डीसीपी दर्जाच्या नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली आहे.
गृह विभागाने सोमवारी ११८ डीसीपी, एसपी, एडीएसपी, एसडीपीओ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये सुमारे १४ डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली. शिंदे सरकारमधील या दर्जाच्या अधिकाऱ्यांची आतापर्यंतची ही सर्वात मोठे फेरबदल असल्याचे बोलले जात आहे.
इतर महिलांवरील अत्याचाराचं काय? करुणा मुंडेंचा राष्ट्रवादीला परखड सवाल
या आदेशात प्रशांत मोहिते, नम्रता पाटील, संदीप डोईफोडे, दीपक देवराज, सुनील लोखंडे, प्रकाश गायकवाड, तिरुपती काकडे, योगेश चव्हाण, शर्मिष्ठा यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे.
गृह विभागाच्या आदेशात डीजीपींनी हस्तक्षेप का केला, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा सुरू आहे.
शिंदे सरकारने यापूर्वी सप्टेंबरमध्ये मोठ्या बदल्या केल्या होत्या. त्यांनी ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या बदल्या करण्यात आल्या होत्या.