शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादा विधानसभेतच सांगणार होते 'त्या' शपथविधीमागचं रहस्य; इतक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 09:29 IST

देवेंद्र फडणवीस, अजित पवारांंच्या शपथविधीचं रहस्य अखेर रहस्यच राहिलं

मुंबई : रात्रभराच्या वेगवान घडामोडींनंतर पहाटे, पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून अन् अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून राजभवनावर घेतलेल्या त्या शपथेमागचे रहस्य गुरुवारी विधानसभेत उलगडता उलगडता राहिले. फडणवीस यांनी पवारांना रोखले नसते तर कदाचित अजितदादांनी ते रहस्योद्घाटन केलेही असते.त्याचे असे झाले की आझाद मैदानावर मराठा समाजाचे तरुण आंदोलनास बसले असल्याचा मुद्दा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला. या तरुणांना न्याय द्या. अजितदादा तर ऑन द स्पाट निर्णय घेतात. रात्री सर्व घडामोडी घडल्या आणि सकाळी सकाळी त्यांनी शपथच घेतली असे पाटील म्हणाले.तेव्हा यावर आता अजितदादा काय बोलतात हे ऐकण्यासाठी सभागृहात शांतता पसरली. ते बोलायला उभे देखील राहिले व तो रहस्यपट उलगडला जाणार असे सगळ्यांनाच क्षणभर वाटून गेले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खाली बसूनच म्हणाले की, तुम्ही यांच्याकडे (चंद्रकांतदादा) लक्ष देऊ नका, तुम्ही बोलू नका, मी ही बोलत नाही. हे ऐकताच मग मी पण बोलत नाही, असे हसतहसत म्हणत अजितदादा खाली बसले.सोमवारपर्यंत बैठकमराठा समाजातील जे तरूण आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी येत्या सोमवारपर्यंत आपण एक बैठक घेऊ. सर्व संबंधित अधिकारीदेखील या बैठकीला उपस्थित असतील.चंद्रकांत पाटील यांना देखील या बैठकीला बोलाविण्यात येईल व प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा