शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

'बजाज कोविड किंवा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ नाहीत'; देवेंद्र फडणवीसांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 14:59 IST

देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली.

केंद्र सरकारने देशात क्रूर पद्धतीने लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे साथीचा फैलाव तर रोखला गेला नाहीच शिवाय अर्थव्यवस्थेचेही प्रचंड नुकसान झाले अशी टीका उद्योगपती राजीव बजाज यांनी केली होती. देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत राजीव बजाज यांची काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुलाखत घेतली. त्यावेळी बजाज यांनी हे मत व्यक्त केलं होतं. बजाज यांच्या वक्तव्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. 

बजाज हे कोविड किंवा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ नाहीत असं म्हणत फडणवीस यांनी टोला लगावला आहे. तसेच ते उद्योगपती आहेत. दुचाकी गाड्यांबाबत ते बोलले असते तर तो त्यांचा अधिकार ठरला असता असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना राजीव बजाज यांच्या वक्तव्यावरून एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 'त्यांना वाटतं हा कठोर लॉकडाऊन होता मला नाही वाटत कठोर होता. एखादा तज्ज्ञ हे बोलला असता तर वेगळी गोष्ट आहे. ते तज्ज्ञ नाहीत' असं उत्तर दिलं आहे. 

"बजाज कुटुंब हे वाहन निर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. ते आरोग्य क्षेत्रातील किंवा कोविडचे तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे कोविडसंदर्भात काय केलं पाहिजे हे त्यांचं मत अंतिम सत्य असू शकत नाही. ते स्कूटर कशी बनवायला हवी होती, रिक्षा कशी बनवायला हवी होती किंवा कार कशी बनवायची यासंदर्भात बोलले असते तर ते सत्य असू शकतं. मात्र कोविडदरम्यान काय केलं पाहिजे याबद्दल तुमचं किंवा माझं मत असू शकतं तसेच राजीव बजाज यांचं एक मत असू शकतं" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

राजीव बजाज यांनी 'पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करीत केंद्र सरकारने अत्यंत क्रूर पद्धतीने लॉकडाऊन लागू केले. त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या स्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या सबळ वर्गातील काही प्रमाणात तग धरू शकतात. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे असे मजूर, गरीब वर्गातील लोक, शेतकरी यांच्यासाठी हा अतिशय कठीण काळ आहे. या वर्गातील लोकांना सध्या अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. ही वस्तुस्थिती डोळ्याला दिसत असूनही केंद्र सरकार त्यापासून काही धडा शिकायला तयार नाही' असं म्हटलं होतं. उद्योगपती राजीव बजाज व राहुल गांधी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारवर इतक्या परखडपणे देशातील कोणत्याही उद्योगपतीने जाहीर टीका केली नव्हती. लॉकडाऊन व केंद्र सरकारच्या धोरणांबाबत राजीव बजाज यांनी आपली मते या मुलाखतीत मांडली. 

महत्त्वाच्या बातम्या

30 जून आधी पूर्ण करा 'ही' 7 महत्त्वाची कामं, नाहीतर होईल मोठं नुकसान

CoronaVirus News : ...म्हणून कोरोना पॉझिटिव्ह महिलेने बाळाचं नाव ठेवलं 'सॅनिटायझर'

CoronaVirus News : शिक्षणासाठी काय पण! 'या' मुलीच्या जिद्दीला तुम्हीही कराल सलाम

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंता वाढवणारी आकडेवारी

CoronaVirus News : मंदिरात सॅनिटायझरच्या वापराला पुजाऱ्यांचा विरोध; 'हे' आहे कारण

CoronaVirus News : लढ्याला यश! भारताने विकसित केलं स्वस्त कोरोना चाचणी किट; अवघ्या 20 मिनिटांत मिळणार रिझल्ट

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतcongressकाँग्रेसBJPभाजपा