Devendra Fadnavis: “जो बीत गई, वो बात गई”; भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर देवेंद्र फडणवीस यांची सूचक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 18:02 IST2022-04-29T18:01:32+5:302022-04-29T18:02:47+5:30
Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी घेतलेल्या बहुतांश भूमिका आमच्याही राहिलेल्या आहेत, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-मनसे युतीवर भाष्य केले आहे.

Devendra Fadnavis: “जो बीत गई, वो बात गई”; भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर देवेंद्र फडणवीस यांची सूचक प्रतिक्रिया
मुंबई: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी एक मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. सन २०१७ मध्येच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची चर्चा झाली होती. मंत्रीपदेही ठरली होती. मात्र, राष्ट्रवादीने युती करण्यास नकार दिला, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भाजप आणि मनसेच्या युतीबाबत विचारण्यात आले. या युतीच्या बातम्या कपोलकल्पित आहेत. काही लोकांनी सोडलेल्या बातम्या आहेत. आमची अजून कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे, की अलिकडच्या काळात राज ठाकरेंनी घेतलेल्या बहुतांश भूमिका आमच्याही राहिलेल्या आहेत. पण आमची कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाही. त्यामुळे आत्ता त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया फारच अपरिपक्व आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जो बीत गई, वो बात गई
२०१७ मध्ये नेमके काय घडले होते? यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली असता, “जो बीत गई, वो बात गई” अशी एका वाक्यात प्रतिक्रिया देत यावर अधिक बोलणे टाळले. तर, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीच्या दोन वर्षेपूर्वीच अर्थात २०१७मध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीसंदर्भात अंतिम बोलणी झाली होती. भाजपाला २०१७ मध्येच राष्ट्रवादीसोबत युती करावी असे वाटू लागले होते. राज्यात राष्ट्रवादी आणि भाजप असे सरकार करावे, अशी चर्चा झाली. पालकमंत्री देखील ठरले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने युती करायला नकार दिला, असे आशिष शेलार यांनी अलीकडेच म्हटले होते.
दरम्यान, गेल्या काही कालावधीपासून भाजप आणि मनसेच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहे. मात्र, दोन्ही पक्षांकडून अद्याप यावर अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.