शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
3
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
4
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
5
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
6
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
7
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
8
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
9
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
10
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
11
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
12
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
13
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
14
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
15
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
16
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
17
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
18
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
19
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

"दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी केलं होतं मिरची हवन"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 3:47 PM

विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडींवर लिहिलेल्या पुस्तकात दावा

मुंबई: शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी धुडकावून अजित पवारांसोबत सकाळी लवकर शपथविधी उरकण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी मिरची हवन केलं होतं, असा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला सत्तेपासून दूर राहावं. त्यावेळी झालेल्या राजकीय घडामोडींवर आधारित 'चेकमेट: हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र' या पुस्तकात फडणवीसांनी केलेल्या मिरची हवनचा उल्लेख आहे. सुधीर सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या 'चेकमेट: हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र' पुस्तक डिजिटल स्वरुपात प्रकाशित झालं आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. बहुमताचा आकडा गाठलेल्या शिवसेना-भाजपामध्ये सत्तावाटपावरून निर्माण झालेला दुरावा, शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी, त्याला भाजपाचा असलेला विरोध यावरून महाविकास आघाडीची समीकरणं जुळली. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असं राज्यातल्या जनतेला वाटू लागलं. मात्र २३ नोव्हेंबरच्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत शपथविधी आटोपला. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी सूत्रं हाती घेत सगळी चक्रं फिरवली. त्यामुळे अजित पवारांचं बंड फसलं.राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाची पार्श्वभूमी, अजित पवारांचं बंड, त्यांची घरवापसी, अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना दाखवण्यात आलेली आमिषं, या खेळातलं पडद्यामागचे खेळाडू, पवारांनी हलवलेली सूत्रं, या सगळ्या घडामोडींवर सूर्यवंशी यांनी पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी 'मिरची हवन' केल्याचा दावा पुस्तकातून करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातल्या नालखेडा येथील बागलामुखी मंदिराच्या पुजाऱ्यांकडून फडणवीसांनी हवन करून घेतलं होतं. उत्तराखंडमधलं हरीश रावत सरकार या 'मिरची हवन'मुळं वाचल्याचं फडणवीसांना सांगण्यात आलं होतं. त्यामुळे फडणवीसांनी हे हवन केलं होतं. मिरची हवन करणाऱ्या तांत्रिकाच्या सांगण्यावरूनच शपथविधीच्या वेळी फडणवीसांनी त्यांच्या आवडत्या निळ्या रंगाच्या जॅकेटऐवजी काळ्या रंगाचं जॅकेट घातलं होतं, असाही दावा पुस्तकात करण्यात आला आहे.कोरोनासंदर्भात विरोधकांची मोठी बैठक; उद्धव ठाकरे अन् ममतांसह 15 पक्षाचे नेते होणार सहभागीमोदींना पत्र लिहिणाऱ्या पवारांनी उद्धव ठाकरेंनाही पत्र पाठवावं; फडणवीसांचा टोलाउमेदवारीवरुन एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेवर गोपीचंद पडळकर म्हणतात...

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना