उमेदवारीवरुन एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेवर गोपीचंद पडळकर म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 03:24 PM2020-05-19T15:24:42+5:302020-05-19T15:25:03+5:30

पडळकर हे धनगर समाजाचे नेते असून त्यांनी नरेंद्र मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकला होता. मात्र, भाजपात आल्यानंतर आता त्यांना संधी देण्यात आल्याचे सांगत खडसेंनी

Gopichand Padalkar says on the criticism made by Eknath Khadse from the candidature ... MMG | उमेदवारीवरुन एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेवर गोपीचंद पडळकर म्हणतात...

उमेदवारीवरुन एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेवर गोपीचंद पडळकर म्हणतात...

googlenewsNext

मुंबई - विधानपरिषदेसाठी माझं, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची शिफारस दिल्ली दरबारी झाल्याचं आम्हाला सांगण्यात आलं होतं. मात्र, आमच्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचं समजल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली आहे. गोपीचंद पडळकर यांना विधानपरिषदेचं तिकीट देण्यात आल्याबद्दलही खडसेंनी नाराजी व्यक्त केली होती. खडसेंनी जाहीरपणे गोपीचंद पडळकर यांच्या नावाचा उल्लेख करुन त्यांच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित केले होते. आता, याबाबत गोपीचंद पडळकर यांनी आपलं मत मांडलं आहे. 

पडळकर हे धनगर समाजाचे नेते असून त्यांनी नरेंद्र मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकला होता. मात्र, भाजपात आल्यानंतर आता त्यांना संधी देण्यात आल्याचे सांगत खडसेंनी पक्षाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. याबाबत, बीबीसी मराठीच्या फेसबुक लाईव्हमध्ये पडळकर यांना खडसेंच्या तुमच्यावरील नाराजीबद्दल काय सांगाल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना मी भाजपाचा सामान्य कार्यकर्ता आहे. एकनाथ खडसे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे, त्यांनी काय बोललं यावर, मला काहीही बोलायचं नाही. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे, मी पक्षाचा लहान कार्यकर्ता आहे, मी गेल्या ७ महिन्यांपासून भाजपासोबत आहे. पक्षाच्या आदेशावरुनच मी बारामती मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे, मोदींवरील भाषणाचा माझा व्हिडिओ किंवा ती घटना आता जुनी झालीय, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.   

भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली, व हे नेते आमदार झाले आहेत. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन लांबल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आहेत, तर गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याविरोधात बारामती मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती, प्रवीण दटके हे नागपूरचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांचे वडील प्रभाकरराव दटके हे भाजपाचे नेते होते. अजित गोपछेडे हे तीन दशकांहून अधिक काळ भाजपाचे कार्यकर्ते आहेत. या चारही नेत्यांना भाजपाकडून संधी मिळाली आहे. मात्र, तत्पूर्वीच एकनाथ खडसेंनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. 

दरम्यान, भाजपाकडून विधानपरिषदेसाठी नवख्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. निष्ठावंताना डावलून पक्षाविरुद्ध कार्य करणाऱ्यांना पक्षाने तिकीट दिले आहे. मी ४० ते ४२ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचं काम करत आहे. पक्षाच्या जडणघडणीत आम्ही अनेक चढउतार पाहिले आहेत. त्यामुळे एकनिष्ठ म्हणून आम्हाला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपाविरोधी काम करणारे, गो बॅकच्या घोषणा देणाऱ्या पडळकरांना संधी देण्यात आली. वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केलेल्या मोहितेपाटलांना पक्षानं तिकीट दिलं. त्यामुळे, भाजपा नेमकं कोणत्या दिशेनं चाललाय, हेच समजत नाही, असे म्हणत एकनाथ खडसेंनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर टीका केली होती.

Web Title: Gopichand Padalkar says on the criticism made by Eknath Khadse from the candidature ... MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.